सातवीच्या विद्यार्थ्यांवर शेरेबाजीप्रकरणी कारवाई

By Admin | Updated: February 3, 2017 03:57 IST2017-02-03T03:57:18+5:302017-02-03T03:57:18+5:30

लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयातील ६ ते ७ विद्यार्थ्यांना सुमारे १५ दिवसांपासून शाळेत बसण्यास मनाई करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली

Action on the sacking of students of VII | सातवीच्या विद्यार्थ्यांवर शेरेबाजीप्रकरणी कारवाई

सातवीच्या विद्यार्थ्यांवर शेरेबाजीप्रकरणी कारवाई

पुणे: लुल्लानगर येथील केंद्रीय विद्यालयातील ६ ते ७ विद्यार्थ्यांना सुमारे १५ दिवसांपासून शाळेत बसण्यास मनाई करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींना शेरेबाजी केल्या प्रकरणी ही कारवाई केल्याचे लेखी पत्रच विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आले आहे.
‘तुमचा मुलगा शाळेतील मुली व शिक्षिकांकडे पाहून शेरेबाजी करतो. त्याच्यामुळे वर्गातील वातावरण बिघडत आहे. इतर विद्यार्थ्यांवरही त्याचा वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे तुमच्या मुलाला घरीच ठेवा, पुन्हा शाळेत पाठवू नका. मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसता येईल, असे लेखी पत्र शाळेतर्फे पालक शंकर कांबळे यांना पाठविण्यात आले आहे.
कांबळे म्हणाले, शाळा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मला शाळेत बोलवून घेतले होते. तसेच माझ्या मुलासह इतर ६ ते ७ मुले वर्गात अश्लिल शेरेबाजी करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला. एवढ्या लहान वयातील मुलांकडून शेरेबाजी कशी केली जाऊ शकते? असा सवाल मी उपस्थित केला.
त्यावर आमचे ऐकून न घेता मुलाला शाळेत बसण्याची परवानगी नाकारली. गेल्या महिन्यापासून माझा मुलगा घरी बसून आहे. शाळेन काढून टाकल्याने तो घाबरला आहे. यापूर्वी एका शिक्षकाने मुलाला मारहाण केली होती.

Web Title: Action on the sacking of students of VII