नदी प्रदूषणप्रकरणी महापालिकेवर कारवाई
By Admin | Updated: July 17, 2015 03:45 IST2015-07-17T03:45:00+5:302015-07-17T03:45:00+5:30
पवना, इंद्रायणी व मुळा नदीत थेट सांडपाणी पात्रात सोडल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेसह आळंदी नगर परिषदेवर पुणे

नदी प्रदूषणप्रकरणी महापालिकेवर कारवाई
पिंपरी : पवना, इंद्रायणी व मुळा नदीत थेट सांडपाणी पात्रात सोडल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेसह आळंदी नगर परिषदेवर पुणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, तर लोणावळा व तळेगाव दाभाडे नगर परिषदेला सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मनसे पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी गुरुवारी दिली.
पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार असल्याची तक्रार मनसेच्या पर्यावरण विभागाने केली होती. तसेच इंद्रायणी नदी प्रदूषणाला जबाबदार ठरणाऱ्या महापालिकेसह लोणावळा, आळंदी आणि तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी ३ वर्षांपासून प्रदूषण मंडळाकडे पाठपुरावा सुरू होता. या तक्रारीची दखल घेऊन प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरातील नदीपात्रालगतच्या परिसराची पाहणी केली. (प्रतिनिधी)
तळेगाव दाभाडे नगर परिषदेला ही यंत्रणा उभारण्याचे निर्देश देत,आळंदी नगर परिषदेच्या निष्काळजीपणाबद्दल पुणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीत दररोज निर्माण होणाऱ्या २९१ एमएलडी घरगुती सांडपाण्यापैकी २४० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा अस्तित्वात आहे. उर्वरित सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट पवना व इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात असल्याची बाब निदर्शनास आली.