अनधिकृत बांधकामावर कोथरूडमध्ये कारवाई
By Admin | Updated: July 19, 2014 03:25 IST2014-07-19T03:25:52+5:302014-07-19T03:25:52+5:30
महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने कोथरूड तसेच वारजे येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली

अनधिकृत बांधकामावर कोथरूडमध्ये कारवाई
पुणे : महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने कोथरूड तसेच वारजे येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ३ हजार ७०० चौरस फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले. या सर्व मिळकतधारकांना महापालिकेकडून नोटीस बजाविण्यात आली होती.
एमआयटी रस्त्यावरील रामबाग कॉलनी येथील सुमारे ११५० चौरस फुटांचे अनधिकृत शेड, महावीर मेडिकलचे ५० चौरस फूट शेड, सुशांत लाँड्रीचे ५० चौ.फुटांचे शेड,
हॉटेल नैवेद्यम, पिंक हर्बल, चिली चायनिज, आसू व्हेज नॉनव्हेज, बेडेकर मिसळ, न्यू लक्ष्मी कॉफी डे, कानिफनाथ सोसायटीमधील विना परवाना दुकानाचे ३०० चौरस फुटांचे बांधकाम या कारवाईत काढण्यात आले. तसेच, वारजे स.नं. १९ पार्टमधील कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयासमोरील सुमारे ४०० चौरस फुटांचे विनापरवाना २ शेडही या कारवाईत काढण्यात आले. तसेच, वनाज कंपनीसमोरील मेगा मार्ट या दुकानाचे ९०० चौरस फुटांचे शेडही जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाकडून कळविण्यात आली. कार्यकारी अभियंते संभाजी खोत यांच्यासह २५ बिगारी, १ पोलीस गट, १ गॅस कटरच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी)