शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील घरांवर पडणार हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:00 IST

स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाकडून पोलिस, आरपीएफ व जीआरपीच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाईची तयारी मध्य रेल्वेच्या वतीने शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनच्या (डाऊन) बाजुकडील रेल्वेच्या जागेत एकुण १२९ घरे

पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेतील अनधिकृत घरे व दुकानांवर हातोडा पडणार आहे. या भागातील १५९ घरे व २७ दुकानांना नोटीस बजावण्यात आली असून येत्या शनिवारी हे अतिक्रमण हटविले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून पोलिस, आरपीएफ व जीआरपीच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाईची तयारी केली आहे. 

मध्य रेल्वेच्या वतीने शिवाजीनगर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामध्ये फलाटांचाही विस्तार प्रस्तावित आहे. तसेच प्रवाशांसाठी इतर सोयी-सुविधाही उभारण्यात येणार आहेत. मात्र, स्थानक परिसरातील रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यापुर्वी अनेकदा स्थानिकांना जागा रिकामी करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या. पण अद्याप त्यात यश आलेले नाही. आता रेल्वे प्रशासनाकडून हे अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस भुमिका घेण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनच्या (डाऊन) बाजुकडील रेल्वेच्या जागेत एकुण १२९ घरे आहेत. त्यातील ६६ घरे पुणे स्टेशनच्या दिशेला असून उर्वरित घरे खडकीच्या दिशेला आहेत. तर मुख्य फलाट क्रमांक एक (अप)च्या बाहेर एकुण २७ दुकाने आहेत. तर खडकीच्या बाजूला ३० घरे आहेत. उच्च न्यायालयाने २००३ मध्ये शिवाजीनगर स्टेशनवरील फलाटलगतच्या १० मीटर परिसरात अतिक्रमण असू नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार ही ३० घरांतील कुटूंबीयांचे महापालिकेने इतरत्र पुनर्वसनही केले. पण अद्यापही त्यांनी ही जागा सोडलेली नाही. एकुण २७ दुकानांपैकी १७ दुकानांना काही वर्षांपुर्वी रेल्वेने भाडेतत्वावर प्रत्येकी ४ चौरस मीटर जागा दिली आहे. तर १० दुकाने अनधिकृत आहेत.जागा दिलेल्या दुकानचालकांनी जादा जमीन ताब्यात घेऊन त्याचा वापर केला जात आहे. ही जागा देताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांना जागा सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.---------------मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून एकाचवेळी १८६ घरे व दुकानांचे अतिक्रमण हटविण्याची मोठी कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी महिनाभरापुर्वी जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. तसेच काही दिवसांपुर्वी प्रत्येक घरावर नोटीस लावण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वेकडून दि. १५ डिसेंबरला कारवाई केली जाणार आहे. या कारवाईला स्थानिक नागरिकांकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. पण त्याला न जुमानण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे पोलिस, जीआरपी, आरपीएफचा मोठा फौजफाटा यादिवशी तैनात असणार आहे............रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटविणे, ही प्राथमिकता आहे. हे अतिक्रमण काढण्याचा रेल्वेला अधिकार आहे. त्यानुसार तयारी करण्यात आली आहे. सर्व १८६ जणांना घरे व दुकाने रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी कारवाईपुर्वी घर-दुकानातील सामान हलवावे, असे त्यांना आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईची तयारी पुर्ण झाली आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेEnchroachmentअतिक्रमण