शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर येथे गणेश मंडळांचे अध्यक्ष व डी.जे.चालकांवर कारवाई : साहित्य जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 20:55 IST

सात दिवसांच्या व नऊ दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डी. जे. वापरणाऱ्यांवर ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमन व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे.

ठळक मुद्देगणेश मंडळाकडून मोठ्या आवाजात डीजे लावल्याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांना केली तक्रार

पुणे : ध्वनि प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर व डी. जे. मालकांवर हडपसरपोलिसांकडून कारवाई केली आहे. सात दिवसांच्या व नऊ दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीत डी. जे. वापरणाºयांवर ध्वनिप्रदूषण नियंत्रण अधिनियमन व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहे.मगरपट्टा परिसरात अखिल भोरी भडक मित्र मंडळाकडून डीजेसह मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत आवाजाची पातळी १२० डेसीबल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी डीजेचे साहित्य जप्त करून गणेश मंडळाचे अध्यक्ष चंदन कैलास तुपे व उपाध्यक्ष सुजित दिलीप माने तसेच डीजे मालक साहील सय्यद मुन्नावर यांच्यावर कारवाई केली.    दुसऱ्या घटनेत मांजरी येथे सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत राजहंस गणेश मित्र मंडळ यांनी वाहनात फेरफार करून डीजे लावला होता. पोलिसांनी त्याची पातळी मोजली असता ती १०० डेसीबल पेक्षा जास्त असल्याची आढळले. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष गिरीश कानकाटे व डीजे मालक राजू तावडे कृष्णराज यांच्यावर कारवाई करून डीजे साहित्य जप्त केले. तर तिसऱ्या घटनेत मगरपट्टासिटी येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत स्टार सिझन गणेश मंडळाकडून मोठ्या आवाजात डीजे लावल्याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांना तक्रार केली होती. त्यांच्या डीजेच्या आवाजाची पातळी तपासली असता ती १०० डेसीबल पेक्षा जास्त आढळली. मंडळाचे अध्यक्ष अनिकेत दिलीप मोरे, उपाध्यक्ष विक्रम गाटे, डीजे मालक दिगंबर नारायण उंदरे, चालक अतुल संभाजी अटोळे यांच्यावरही कारवाई केली. त्यांचे डीजे चे साहित्यही जप्त केले आहे. अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे व पोलीस उपनिरीक्षक गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. हडपसर परिसरात गणेशोत्सवा दरम्यान शेवटच्या दिवशी अशीच जोरदार कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले.  

टॅग्स :HadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGanpati Festivalगणेशोत्सव