चाकणला दामिनी पथकाची दणकेबाज कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:00 AM2017-11-10T02:00:07+5:302017-11-10T02:00:07+5:30

महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसेंदिवस शहरात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाकण पोलिसांनी महिला छेडछाड प्रतिबंधक दामिनी पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे

The action of Chakanala Damini Squadron | चाकणला दामिनी पथकाची दणकेबाज कारवाई

चाकणला दामिनी पथकाची दणकेबाज कारवाई

Next

चाकण : महिला आणि मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण दिवसेंदिवस शहरात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाकण पोलिसांनी महिला छेडछाड प्रतिबंधक दामिनी पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. या पथकांकडून सावर्जनिक ठिकाणे आणि महाविद्यालय परिसरात प्रबोधनासोबत रोडरोमियोंवर कारवाईही करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अनेकांना दणक्यांचा प्रसाद देण्यास सुरुवात केली आहे.
शिवाजी महाविद्यालय परिसरात गाडीवरून ट्रिपलसीट फेºया मारणारे, तसेच मुलींना त्रास देणाºया थिल्लर तरुणांसाठी हे पथक म्हणजे एक प्रकारे जरब बसविण्याचे हत्यारच झाले आहे. महाविद्यालय भरताना आणि सुटल्यावर दुचाकीवर ट्रिपलसीट बसून मुलींची छेड काढणाºया रोडरोमियोची संख्या चाकण शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
मुलींचा पाठलाग करून
त्यांना त्रास देणाºयांचे प्रतापही खूप वाढलेले आहे. त्या बद्दलच्या अनेक तक्रारी येऊ लागल्याने चाकण शहरात दामिनी पथकाने जोरदार मोहीम उघडली आहे.
हे पथक आता आपली जोरदार कामगिरी करत आहेत. या पथकाला महाविद्यालय परिसरात पाहताच अनेक रोमिओ धूम ठोकत आहेत. तृप्ती गायकवाड, टी. एम. गायकवाड यांच्यासह चाकण पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल
आणि त्याचे सहकारी तासातासाने येत व परिसरात मोटर सायकलीवरून घुटमळणाºया मजनूंची व
रपेट मारण्याºयांची चांगलीच धुलाई करत आहेत.

Web Title: The action of Chakanala Damini Squadron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.