Lok Sabha Election Result 2024 : "माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 08:25 AM2024-06-06T08:25:31+5:302024-06-06T08:33:19+5:30

Lok Sabha Election Result 2024 And Adhir Ranjan Chowdhury : बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल भीती व्यक्त केली.

Lok Sabha Election Result 2024 baharampur congress hands Adhir Ranjan Chowdhury said coming time very difficult | Lok Sabha Election Result 2024 : "माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही"

Lok Sabha Election Result 2024 : "माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही"

Lok Sabha Election Result 2024 : पश्चिम बंगालच्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल भीती व्यक्त केली आहे. माझे राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही, असं म्हटलं आहे. एका बंगाली टीव्ही चॅनलशी बोलताना अधीर रंजन म्हणाले की, कठीण काळ येणार असल्याची भीतीही त्यांना वाटते. ते म्हणाले की, या सरकारशी (टीएमसी) लढण्याच्या प्रयत्नात मी माझ्या उत्पन्नाच्या स्त्रोताकडे दुर्लक्ष केलं आहे. मी स्वतःला बीपीएल खासदार म्हणवतो. राजकारणाशिवाय माझ्याकडे दुसरं कौशल्य नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत माझ्यासाठी अडचणी येणार आहेत आणि त्यावर मात कशी करावी हे मला माहीत नाही.

बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार युसूफ पठाण विजयी झाले आहेत, तर अधीर रंजन चौधरी यांचा ८५०२२ मतांनी पराभव झाला आहे. युसूफ पठाण यांना ५२४५१६ तर अधीर रंजन यांना ४३९४९४ मतं मिळाली. अधीर रंजन चौधरी यांच्या पराभवामुळे बंगालमधील काँग्रेसच्या शेवटच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असलेल्या बहरमपूरवरील काँग्रेसची राजकीय पकड संपुष्टात आली आहे. बंगालमधील मालदा दक्षिणेतील केवळ एक जागा काँग्रेसने जिंकली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अधीर रंजन चौधरी म्हणाले की, "ते लवकरच त्यांचे खासदार निवास रिकामं करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. माझी मुलगी सध्या शिक्षण घेत आहे आणि कधी-कधी दिल्लीला अभ्यासासाठी जाते. मला तिथे नवीन घर शोधावं लागेल, कारण माझ्याकडे एकही घर नाही."

निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींच्या इंडिया ब्लॉकशी जवळीक साधताना, चौधरी म्हणाले की, त्यांनी विरोधी व्यासपीठावर टीएमसीच्या उपस्थितीवर कधीही आक्षेप घेतला नाही, परंतु त्यांनी बॅनर्जींसोबतच्या युतीला विरोध करून पक्षाची हानी केली आहे हे त्यांनी मान्य केलं. राज्य पीसीसी प्रमुखपदावर कायम राहणार का, असे विचारले असता अधीर रंजन म्हणाले की, मी निवडणुकीत माझा पराभव स्वीकारला आहे. मला माझे पद सोडायचे होते, माझ्या नेत्यांना या पदासाठी माझ्यापेक्षा योग्य कोणीतरी शोधण्याची विनंती केली, परंतु सोनिया गांधींच्या विनंतीवरून मी हा निर्णय मागे घेतला आहे. माझ्या नेत्यांचा मला अद्याप कोणताही फोन आलेला नाही. एकदा मला फोन आला की मी माझ्या पक्षाला माझी इच्छा पुन्हा सांगेन.

अधीर रंजन म्हणाले की, बहरामपूरमध्ये प्रचारासाठी कोणत्याही नेत्याला न पाठवण्याचा पक्षाचा निर्णय आहे आणि यासंदर्भात त्यांचे कोणतेही भाष्य नाही. ते म्हणाले की, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुर्शिदाबादला पोहोचली तेव्हा आम्ही त्यात सहभागी झालो. आमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एकदा मालदामध्ये प्रचार करत होते, पण बहारमपूरला कधीच आले नाहीत. हा आमच्या केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय होता, ज्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही.

Web Title: Lok Sabha Election Result 2024 baharampur congress hands Adhir Ranjan Chowdhury said coming time very difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.