शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विना परवाना सिक्युरिटी एजन्सी चालविणाऱ्यांवर कारवाई होणार : डॉ. के. व्यंकटेशम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:57 IST

सुरक्षा रक्षकाला योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास ५ दिवसात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळेल..

पुणे : जे विनापरवाना सिक्युरिटी एजन्सी चालवतात अशा चालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच सिक्युरिटी एजन्सीच्या परवान्याकरिता पैशाची  मागणी होत असल्यास माहिती द्यावी, त्यावर कठोर कारवाई केली जाईल. दि. १५ ऑगस्टनंतर सुरक्षा रक्षकाला योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास ५ दिवसात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के.वेंकटेशम यांनी दिली.     पुणे पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षक संस्था यांचे वतीने पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ चा कार्यक्रम पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये साजरा करण्यात आला. त्यावेळी सुरक्षा रक्षक मालकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त गुन्हे बच्चन सिंग , अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. संजय शिंदे , तसेच भारत शिल्ड फोर्सचे संस्थापक सचिन मोरे व महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक  सेवा पुरवठादार संस्थेचे मालक आणि चालक कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते.    डॉ. व्यंकटेशम म्हणाले, भविष्यकाळात पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशीप प्रोग्रॅम पी-४ या उपक्रमाच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणावर पुणे सुरक्षित करण्यावर भर दिला जाईल आणि  शहरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याकरीता नागरिकांची जागरुकता आणि सहकार्याची अपेक्षा त्यावर त्यांनी भर दिला तसेच सर्व कामकाज गतिमान करण्यासाठी ऑनलाईन सुविधा असणार आहे. शहरात कोठेही काहीही झाल्यास १०० नंबर प्रमाणेच ८७७५२८३१०० व्हॉटअँप नंबर वर माहिती देण्याचे आवाहन केले आहे    अशोक मोराळे  म्हणाले, खाजगी सुरक्षा रक्षक हे गृहनिर्माण हौसिंग सोसायटी, मॉल, हॉटेल अँड रेस्टोरंट-पब, सर्व प्रकारची दुकाने, आय टी कंपनी, खाजगी बंगले, बँक- ए. टी. एम, सर्व प्रकारची ऑफिस, हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, उद्याने, सार्वजनिक पे अँड पार्क पार्किंग, कॉमेर्सिअल कॉम्प्लेक्स, ज्वेलरी शॉप, बिग बाजार, डी मार्ट, सिनेमा गृह, शासकीय निमशासकीय संस्था, सरकारी कार्यालय, कारखाने, औद्योगिक वसाहत, विविध बाजारपेठ इ. ठिकाणी काम करतात त्यांनी पोलिसांचे खासदूत म्हणून काम केल्यास मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यांवर आळा बसू शकतो आणि जे गुन्हे घडले त्यांच्या तपासाला चालना मिळू शकते. पोलीस स्टेशन आणि सुरक्षा रक्षक यांचे  १२० व्हाट्स अप ग्रुप तयार करून संपूर्ण शहरात २१ हजाराहून खाजगी रक्षक जोडण्यात आले आहेत.    पुणे गुन्हे शाखेच्या वतीने आभारप्रदर्शन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी