शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्याने महापालिकेकडून पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 07:00 IST

गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देएरंडवणा येथील हिमाली सोसायटीमध्ये २५ मोटारी जप्तशहराच्या पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये पाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पातील धरणांची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यात जून महिना सरत आला तरी पाऊस पडण्याचे चिन्ह दिसेनात. पाऊस लांबल्यास पाणी पुरवठ्याची स्थिती गंभीर होऊ शकते, यामुळेच महापालिकेच्या वतीने शहरामध्ये पाण्याची चोरी करणा-यावर कडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून मंगळवारी एरंडवणा येथील हिमाली सोसायटीतून २५ पाण्याच्या मोटारी जप्त करण्यात आल्या.

    गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामध्ये महापालिकेकडून एक वेळच पाणी पुरवठा करण्यात येत असून, अनेक भागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.  याशिवाय देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेची दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊन अघोषित पाणी कपात सुरु आहे. शहराच्या पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये पाणी चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत.  अनधिकृत नळ कनेक्शन सोबतच अनेक भागात थेट महापालिकेच्या पाण्याच्या लाईनला मोटारी टाकून अधिकचे पाणी घेण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. या पाणी चोरीबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरु केली असून, यासाठी स्वतंत्र भरारी पथके नियुक्त केली असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी.कुलकर्णी यांनी दिली.     हिमाली सोसायटीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईबाबत कुलकर्णी यांनी सांगितले की, सोसायटीमधील काही रो हाऊसमध्ये मोटारी लावून पाणी चोरी केली जात असून, सोसायटी व लगतच्या परिसरात नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा मिळत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आली होती. या तक्ररी नुसार महापालिकेच्या भरारी पथकाने पाहणी केली असता येथील अनेक रो हाऊसमध्ये थेट पाईप लाईलाच मोटारी टाकून पाण्याची चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणाहून तब्बल २५ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाण्याची चोरी करून हे पाणी चक्क गाड्या धुण्यासाठी वापरले जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे या सर्व मोटारी जप्त करण्यात आल्या असून, प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. दरम्यान अशा प्रकारे पुन्हा पाणी चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संपूर्ण सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, अशा इशारा पाणी पुरवठा विभागाने सोसायटीला दिला आहे. दरम्यान शहरामध्ये अशा प्रकारे पाणी चोरी करण्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे व्ही.जी.कुलकर्णी यांनी सांगितले. ---------------पुढील सहा दिवस पुणेकरांना कमी दाबाने पाणी पुरवठामहापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणाच्या गेटची चाचणी व दुरुस्तीचे काम सुरु आहे. धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, बंद पाई लाईन मधून पाणी येणा-या प्रमाण कमी झाले आहे. यामुळे शहराला अपेक्षित पाणी पुरवठा करण्यास अनेक अडचणी येत असून, ही चाचणी पूर्ण करण्यासाठी किमान ५ ते ६ दिवस लागणार आहेत .यामुळे या कालावधीत शहरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने निविदेन काढून जाहीर केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीtheftचोरीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका