शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

बारामतीत वाळू उत्खनन करणाऱ्या दोघांवर कारवाई; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 12:30 IST

पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली

सांगवी : नीरा नदीतून विना परवाना वाळू उत्खनन करणाऱ्या दोघांविरोधात माळेगाव पोलिसांनी कारवाई केली असून आरोपींकडून 3 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर शंकर मोरे पोलीस कॉन्स्टेबल नेमणुक माळेगाव पोलीस स्टेशन यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी  राजेंद्र ज्ञानदेव मदने (वय 32) रा.शिरवली (ता. बारामती, जि. पुणे),अनिल नारायण रावत (वय 45),रा.शिरवली (ता.बारामती,जि.पुणे) यांच्यावर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोलिंग दरम्यान पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. पेट्रोलिंग दरम्यान गुरुवार (दि.6) रोजी सायंकाळी नीरा नदीतून वाळू उत्खनन करून शिरवली (ता.बारामती) गावच्या हद्दीत चालक राजेंद्र ज्ञानदेव मदने हा ट्रॅक्टरवरून खांडज शिरवली मार्गे येत होता. यावेळी पोलिसांनी चालक राजेंद्र मदने याला अटक केली असून,मालक अनिल रावत हा फरार झाला आहे. यामध्ये तीन लाख रुपये किमतीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व डम्पिंग टेलर तसेच त्यामधील 9 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSocialसामाजिकsandवाळू