शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटयार्डमध्ये रात्रभर जुगार खेळणार्‍यांवर कारवाई ; १९ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 20:10 IST

कुलूप तोडून केली कारवाई; पिंपरी चिंचवड येथील नगरसेवकापासून महापालिकेतील ठेकेदारांचा समावेश

पुणे : मार्केटयार्ड येथील विद्यासागर कॉलनीमधील एका बंगल्यात रात्रभर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर मार्केटयार्ड पोलिसांनी आज पहाटे छापा घातला. या बंगल्याचा दरवाजाला बाहेरुन लावलेले कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. आतील १९ जणांना अटक करण्यात आली आहे.

जुगार अड्डा चालविणार्‍या हर्षल पारेख याच्या सांगण्यावरुन ते बंगल्यात जुगार खेळण्यासाठी आले होते. यामध्ये पिंपरी चिंचवड येथील नगरसेवकापासून महापालिकेतील ठेकेदारांचा समावेश आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून त्यांच्याकडील ५३ हजार ९०० रुपये व १ लाख रुपयांच्या ४ मोटारसायकली जप्त केले आहे. कोरोनाच्या संसर्गाच्या काळात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन विनामास्क जुगार खेळताना आढळून आल्याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मार्केटयार्डमधील विपूल बंगल्यात जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे या आपल्या सहकार्‍यांसह गेल्या. तेव्हा बंगल्याच्या दरवाजाला बाहेरुन कुलूप लावले होते. परंतु, बंगल्याच्या खिडकीतून आत पाहिल्यावर आतमध्ये १५ ते २० जण असल्याचे आढळून आले. तेव्हा पोलिसांनी पंचासमक्ष कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमधील लोकांनी हर्षल पारेख यांच्या सांगण्यावरुन आम्ही येथे जुगार खेळण्यासाठी आलो. तो तुम्हाला जेवण आणून देतो, असे सांगून बाहेरुन कुलूप लावून गेला असल्याचे जुगार खेळणार्‍यांनी सांगितले. हर्षल पारेख हा मार्केटयार्ड परिसरात जुगार अड्डा चालवत होता. पोलिसांनी तो बंद पाडल्यानंतर त्याने बंगल्याच जुगाराचा अड्डा सुरु केला. या ठिकाणी त्याचे वडिल व त्यांचे ५ साथीदार व इतर जुगार खेळणारे आढळले. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.दरम्यान, एका ठिकाणी इतके सर्व जण एकत्र आले असल्याने पोलिसांनी या सर्वांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले. या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यानंतर सर्वांना अटक करुन जामिनावर सोडण्यात आले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक