जेजुरीत विनामास्क फिरणाऱ्या ३२ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:10 IST2021-04-13T04:10:45+5:302021-04-13T04:10:45+5:30

शनिवार व रविवार वीक एन्ड लॉकडाऊन काळात पुरंदर तालुक्यात सासवड व जेजुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात शुकशुकाट होता. व्यावसायिकांनी या ...

Action against 32 people walking in Jejuri without mask | जेजुरीत विनामास्क फिरणाऱ्या ३२ जणांवर कारवाई

जेजुरीत विनामास्क फिरणाऱ्या ३२ जणांवर कारवाई

शनिवार व रविवार वीक एन्ड लॉकडाऊन काळात पुरंदर तालुक्यात सासवड व जेजुरी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात शुकशुकाट होता. व्यावसायिकांनी या वीक एन्ड लॉकडाऊनला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. त्यामुळे पोलिसांना विशेष कोणतीही कारवाई करण्याची गरज भासली नाही.

पुरंदर तालुक्यात सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत या संदर्भात काही किरकोळ कारवाई करण्यात आल्या. शनिवार रविवारी सासवड पोलीसांनी विनामास्क फिरणाऱ्या १० व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर जेजुरी पोलीसांनी विनामास्क फिरणाऱ्या ३२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत १६ हजार रुपयांचा दंड वसुल केले. सासवड पोलीसांनी जमावबंदी उल्लंघन १८८ प्रमाणे ५ ठिकाणी कारवाई करत ५ हजार रुपये दंड वसुल केला. तर जेजुरी पोलीसांना जमावबंदी उल्लंघन १८८ प्रमाणे एकाही ठिकाणी कारवाई करावी लागली नाही.

शनिवार व रविवारी पोलीसांनी कोठेही जास्त कारवाई करावी लागली नाही. गेली वर्षभर जसे विनामास्क, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, कोरोनाचे नियम न पाळणे, पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येणे, दुकानांमध्ये गर्दी करणे अशा ठिकाणी वारंवार दंडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल केले. पण वीक एन्ड लॉकडाऊनच्या काळात अशा कारवाई करण्याची वेळच लोकांनी येऊ दिली नाही.

Web Title: Action against 32 people walking in Jejuri without mask