शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्त्यांवर थुंकणा-या १६० जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:18 IST

गेल्या आठ दिवसांत रस्त्यांवर थुंकणा-या १६० लोकांकडून प्रत्येकी १५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

पुणे : शहरात प्रवास करताना दुचाकी, चारचाकी, बस अथवा पायी चालताना रस्त्यांवर थुंकणे आता तल्लाफबाजांना चागलेच महागात पडणार आहे. महापालिकेच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणाअंतर्गत मोहिम हाती घेण्यात आली असून, गेल्या आठ दिवसांत  अशा प्रकारे रस्त्यांवर थुंकणा-या १६० लोकांकडून प्रत्येकी १५० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यापुढे शहरातील सर्व रस्ते, चौकांमध्ये ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.        केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाअतंर्गत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, तसेच शौच करणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी शासनाने प्रत्येक महापालिकेला आपल्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे थुंकणे, घाण, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौचास जाणा-यांना दंड करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वतीने नुकतेच याबाबत करण्यात येणा-या दंडाचे निवेदन जाहीर केले आहे. यामध्ये रस्त्यांवर घाण करणे, कचरा टाक-यांना १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५० रुपये, उघड्यावर लघवी करणा-याला २०० रुपये आणि उघड्यावर शौचास जाणा-यास ५०० रुपयांचा दंड निश्चित केला आहे.         याबाबत मोळक यांनी सांगितले की, शहरातील तल्लाफ बहाद्दरांवर गेल्या आठ दिवसांपासून कारवाई सुरु करण्यात आली आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनाची देखील मदत घेतली जात आहे. गेल्या आठ दिवसांत शहरातील रस्त्यांवर थुंकणा-या १६० लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये केवळ दंड न करता थुंकलेली जागा संबंधित व्यक्तींकडून साफ देखील करून घेण्यात येत असल्याची माहिती मोळक यांनी दिली. यापुढी ही कारवाई नियमितपणे व सातत्याने करण्यात येणार आहे. सुरुवातील रस्त्यांवर थुंकणा-यावर कारवाई करण्यात येत असून, पुढील काळात सार्वजनिक इमारतींमध्ये घाण करणा-यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्योच मोळक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMONEYपैसा