ही तर सरकारच्या कामाची मतदारांंनी दिलेली पोचपावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:28+5:302020-12-05T04:16:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघात मिळालेला विजय म्हणजे राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारांनी महाविकास ...

This is the acknowledgment of the work of the government given by the voters | ही तर सरकारच्या कामाची मतदारांंनी दिलेली पोचपावती

ही तर सरकारच्या कामाची मतदारांंनी दिलेली पोचपावती

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघात मिळालेला विजय म्हणजे राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीवर दाखवलेला विश्वास व भारतीय जनता पार्टीला दिलेली चपराक आहे अशा शब्दात राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचे वर्णन केले.

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघातील काँग्रेसचे ऊमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या विजयानिमित्त काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी सायंकाळी कदम यांच्या ऊपस्थितीत महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त जल्लोष करण्यात आला. स्वतः आसगावकर,कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार ऊल्हास पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राष्ट्रवादी काँगेसचे बाळासाहेब बोडके यावेळी ऊपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांच्या कोणत्याही टिकेला ऊत्तर देण्याची गरज नाही असे स्पष्ट करून कदम म्हणाले, राज्यातील मतदारांनी त्यांंना झणझणीत ऊत्तर दिले आहे. हा मतदारांनी सरकारवर दाखवलेला विश्वास आहे. सोनिया गांधी, शरद पवार व मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी जनहिताचे निर्णय घेतले. कोरोना संकटातही समर्थपणे पारदर्शी काम केले. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत एकमताने काम केले. हा विजय त्याचीच पोचपावती आहे. हा सरकारवरचा विश्वास आहे.

त्याऊलट भाजपाने सरकारवर जहरी टीका केली. बेलगाम आरोप केले. या निवडणुकीत शिक्षक व पदवीधर म्हणजे समाजातील एक प्रगल्भ वर्ग मतदार होता. त्यांना हे आवडले नाही असे कदम म्हणाले.

प्रा. आसगावकर म्हणाले, मतदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. शिक्षकांच्या समस्या सरकारदरबारी फक्त मांडण्याचेच नाही तर त्या सोडवण्याचेही काम करणार आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,माजी महापौर कमल व्यवहारे, शिवसेनेचे गटनेते प्रुथ्वीराज सूतार, तसेच तिन्ही पक्षांचे प्रमूख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी ऊपस्थित होते.

Web Title: This is the acknowledgment of the work of the government given by the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.