शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पायलकुमारीची यशाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 13:45 IST

जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर पायलकुमारीने मिळवले ९२ टक्के

कल्याणराव आवताडे धायरी: वडील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात तर आई घरकाम करते. राहायला भाड्याने घेतलेली दोन रूमची खोली, लहान एक बहिण व भाऊ, घरची बिकट परिस्थित, मात्र यावर मात करत धायरी येथील पायलकुमारी या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे. पायलकुमारीने ९२ टक्के गुण मिळवून नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

घराचा रहाटगाडा हाकण्यासाठी पायलकुमारीचे वडील प्रमोदकुमार यांनी हॉटेलमध्ये वेटरची नोकरी पत्करली आहे. मूळचे बिहारचे असणारे कुटुंब गेल्या वीस वर्षांपासून धायरी येथे राहावयास आहे. घरची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन पायलकुमारीने शिक्षण घेण्यास सुरुवात केली. घरच्या या हालाखीच्या परिस्थितीमध्येही तिने आपल्या अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ न देता शाळेतील शिक्षकांच्या मदतीने अभ्यास केला.

तिच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. मात्र तिला भविष्यात शास्त्रज्ञ बनायचं आहे. खरं तर तिला शिक्षणाची आस आहे, गुणवत्तेची कास आहे आणि सर्वोत्तमाचा ध्यास आहे,’ मात्र अशी भावना असलेले अनेक विद्यार्थी समाजात आहेत. अशा गुणवंतांचे शिक्षण केवळ आर्थिक समस्येमुळे अडू नये, यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते....परिस्थिती कितीही बिकट असली, तरीही काही माणसं जिद्द सोडत नाही. नियती अग्निपरीक्षा घेत असते, मात्र त्यातूनही काही जण अगदी ताऊन सुलाखून निघतात. संकटांना थेट भिडणारी आणि आभाळ कोसळलं तरी त्यावर पाय रोऊन उभं राहणारी माणसं इतरांसाठी आदर्श ठरतात. परीक्षा ही बळ देते फक्त एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी अभ्यासू वृत्ती आणि चिकाटी असली पाहिजे. मग जिद्दीसमोर बिकट परिस्थिती देखील हार पत्करते.हेच पुन्हा एकदा पायलकुमारी प्रमोदकुमार हिच्या यशावरून समोर येतंय. तिने अत्यंत कठीण परिस्थितीत मिळवलेले यश हे खरच आदर्शवत असल्याचे नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता सतीश चव्हाण यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा