शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

महिला पोलिसाला मारहाण करणारा आरोपी अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 11:30 PM

सापळा रचून ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई : सहा महिन्यांपासून आरोपी होता फरारी

सांगवी : बारामती एमआयडीसी परिसरात निर्भया पथकातील महिला पोलिसासह हवालदारास मारहाण केल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी विजय बाळासो गोफणे अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. बारामती ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.

तीन ते चार गुन्ह्यांतील आरोपी असलेला गोफणे गेल्या सहा महिन्यांपासून फरारी होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : गोफणे हा वंजारवाडी (ता. बारामती) येथील राहणारा आहे. तो गावच्या जवळील रानमळा हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती बारामती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळच्या दरम्यान निर्भया पथकातील महिला पोलिसांचे विद्याप्रतिष्ठान परिसरात पेट्रोलिंग सुरू होते. यावेळी रस्ता अडवून मित्रांसमवेत दुचाकीवर थांबलेल्या विजय गोफणेला पोलिसांनी, इथे का थांबला आहे, असे म्हणून ओळखपत्र व परवाना मागितला. या वेळी गोफणे याने महिला पोलिसालाच उलट बोलून शिवीगाळ करत, मारहाण केली. त्याला रोखण्यास आलेल्या हवालदारालाही मारहाण करून तो पळून गेला. गोफणे गेली सहा महिन्यापासून फरार होता. ही कामगिरी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पत्रे यांनी केली.४महिला पोलिसांना मारहाण झाल्याने सामाजिक, राजकीय क्षेत्र, समाजातून संतप्त अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषत: महिला संघटनांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त केला होता. विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी करून शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणे, पोलीस स्टेशनच्या आवारात मारहाण करणे, बेकायदेशीरपणे शस्त्रसाठा जवळ बाळगणे असे गोफणे विरोधात बारामती शहर व तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी गोफणे यास न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. न्यायलयाने गोफणे यास पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी