वाहन आणि मोबाईल चोरी करणारे आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:54+5:302021-07-14T04:13:54+5:30
२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पुणे शहरासहित जिल्ह्यात वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणारे दोघांना जेरबंद करून त्याच्याकडून १ ...

वाहन आणि मोबाईल चोरी करणारे आरोपी जेरबंद
२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पुणे शहरासहित जिल्ह्यात वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणारे दोघांना जेरबंद करून त्याच्याकडून १ लाख ५३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त आहे. यातील एक जण ५ गुन्ह्यातील पाहिजे असलेला रेकॉर्डवरील फरारी आरोपी आहे.
याप्रकरणी आकाश दयानंद गायकवाड (वय २२, रा. आबनावे वाडा, उरुळी देवाची, ता. हवेली), प्रशांत मधुकर भोसले वय २०, रा. पालखी मार्ग, उरुळी देवाची, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. रविवार (१० जुलै ) रोजी दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप पोलीस हवालदार उदय काळभोर, राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे, शाकिर खान, राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, संभाजी गंगावणे हे पथक वानवडी, हडपसर पोलीस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना जाधव व खरपुडे यांना बातमीदाराकडून रामटेकडी येथे एमआयडीसी पुणे कचरा विलगीकरण प्रकल्प गेटसमोर येथे एका चोरीचे दुचाकीवर दोन इसम बसलेले असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. वरिष्ठांनी दिलेले आदेश व सूचनाप्रमाणे सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने सापळा रचून मोठ्या शिताफीने गायकवाड व भोसले यांना दुचाकीसह पकडले. त्यांचेकडील स्प्लेंडरबाबत माहिती घेतली असता, ती वानवडी पोलीस ठाण्याचे हद्दीतून चोरली असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांचेकडे १८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल मिळून आले. तसेच अधिक चौकशीत त्यांनी आणखीन मोटरसायकल चोरी केल्याचे व उरुळी देवाची येथील एका इमारतीचे मागे विहिरीजवळ लपवून ठेवल्याचे सांगितले. पथकाने तेथून लोणी काळभोर, हडपसर, वानवडी, कोंढवा, वाकड या पोलीस ठाण्याचे हद्दीत चोरलेल्या २ स्प्लेंडर, २ स्प्लेंडर प्लस, १ बजाज पल्सर व १ यामाहा असा एकूण १ लाख ५३ हजार रुपये किमतीच्या ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. यामुळे हडपसर पोलीस ठाण्यातील २ तर कोंढवा, लोणी काळभोर, वानवडी आणि वाकड पोलीस ठाण्याचे हद्दीतील प्रत्येकी १ असे वाहनचोरीचे ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्यांनी चोरी केलेल्या मोबाईल फोनबाबत तपास चालू आहे.
यातील आकाश गायकवाड हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील २ तर, कोंढवा, यवत, अंबोली (मुंबई) पोलीस ठाण्याचे हद्दीतील प्रत्येकी १ अशा एकूण ५ गुन्ह्यातील फरारी आरोपी असून, त्यास सध्या लोणी काळभोर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे. तर प्रशांत भोसले यांस कोंढवा पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ लक्ष्मण बोराटे पोलीस निरीक्षक, वाहनचोरी विरोधी पथक २ सुनील पंधरकर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस हवालदार उदय काळभोर, राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे, शाकिर खान, राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, संभाजी गंगावणे यांनी केली आहे.