दरोडा व रस्ता लूट करणाऱ्या आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:09 IST2021-06-02T04:09:00+5:302021-06-02T04:09:00+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: २० मे रोजी पहाटे साडेपाच वाजता जुना पुणे-सातारा रोड हिल हॉटेलच्या समोर कात्रज येथे आरोपी उमेर ...

Accused of robbery and road robbery arrested | दरोडा व रस्ता लूट करणाऱ्या आरोपींना अटक

दरोडा व रस्ता लूट करणाऱ्या आरोपींना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: २० मे रोजी पहाटे साडेपाच वाजता जुना पुणे-सातारा रोड हिल हॉटेलच्या समोर कात्रज येथे आरोपी उमेर असिफ अन्सारी, नोमेन अस्लम खान, आशरफ आरिफ शेख, जैद जमीर दलाल व एक अनोळखी इसम हे दरोडा टाकण्याच्या व वाहनचालकांना लुटण्याच्या तयारीत होते. त्यांनी सोबत तलवारी, मिरचीपूड, दुचाकी गाड्या असे घेऊन घातक शस्त्र जवळ बाळगून वाहने चोरून नेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यापैकी अशरफ अन्सारी व त्याचा एक साथीदार सदर गुन्ह्यातून फरार झाले होते.

आरोपीचा तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अधिकारी करत होते. त्यांना आरोपी गोकुळनगर चौकात येणार असल्याची खात्रीशीर खबर पोलीस आकाश फासगे यांना मिळाली. शेख हा आज गोकुळनगर येथून गावी पळून जाणार होता.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड ,पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले, आकाश फासगे, पोलीस मनोज बदडे यांनी गोकुळनगर चौक येथे सापळा लावला असता सदर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात असताना शिताफीने पकडून त्यास अटक केली.

Web Title: Accused of robbery and road robbery arrested