‘त्या’ आरोपीस पोलिस कोठडी
By Admin | Updated: September 26, 2016 00:08 IST2016-09-25T23:46:19+5:302016-09-26T00:08:09+5:30
लातूर : शहरातील झिनत सोसायटीत गेल्या काही महिन्यांपासून तीन अल्पवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या नराधमाला विवेकानंद चौक पोलिसांनी रविवारी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता

‘त्या’ आरोपीस पोलिस कोठडी
लातूर : शहरातील झिनत सोसायटीत गेल्या काही महिन्यांपासून तीन अल्पवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या नराधमाला विवेकानंद चौक पोलिसांनी रविवारी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लातूर शहरातील झिनत सोसायटीत राहणारा अहेमद पाशा शेख (५६) हा गेल्या काही महिन्यांपासून खाऊचे आमिष दाखवून तीन मुलींचे लैंगिक शोषण करत होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी आरोपीस कोठडी सुनावण्यात आली.