शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime| खुनाच्या प्रयत्नातील आरोपीचे पुण्यात फलक, महापालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 15:38 IST

दोन दिवस उलटले तरी कारवाई झालेली नाही...

पुणे : शिवसैनिक संतोष परब (santos parab) यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन सातपुते (sachin satpute) याचे वाढदिवसाचे फलक नगर रोड परिसरात झळकत आहेत; परंतु या अनधिकृत फ्लेक्सबाजीवर महापालिकेकडून अद्याप कारवाई झालेली नाही.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान १८ डिसेंबरला कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी अटक केली. सातपुते याला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीमधून बेड्या ठोकल्या. भाजप आमदार नितेश राणे यांचे समर्थक म्हणून सातपुते ओळखले जातात. त्याने पुणे महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

सातपुते अटकेत असतानाही त्याच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक त्याच्या समर्थकांनी मुख्य रस्त्याच्या बाजूला शुभेच्छा फलक झळकवले आहेत. दोन दिवस उलटले तरी कारवाई झालेली नाही. महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाकडे चौकशी केली असता विभाग प्रमुख विजय लांडगे यांनी कारवाई करण्याची सूचना लागलीच क्षेत्रीय कार्यालयास दिली जाईल, असे सांगितले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीChandan Nagarचंदननगर