शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लोहगावातील महिलेच्या खुनातील आरोपी मोकाटच; माहिती देणारास पोलिसांतर्फे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:57 IST

लोहगावात एका महिलेचा पंधरा दिवसांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार आरोपी सुरेश इंगवले याला पकडण्यात अद्यापही यश आलेले नाही.

ठळक मुद्देमहिलेचा खून झाल्यावर चार दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला होता.आरोपीची माहिती व पकडून देणारास रोख रकमेचे बक्षीस : पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील

विमाननगर (पुणे) : लोहगावात एका महिलेचा पंधरा दिवसांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला होता. महिलेचा खून झाल्यावर चार दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. या गुन्ह्यातील पसार आरोपी सुरेश इंगवले याला पकडण्यात अद्यापही यश आलेले नाही. या आरोपीची योग्य माहिती व पकडून देणारास रोख रकमेचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय नाईक पाटील यांनी दिली.विमानतळ पोलिसांनी महिलेसोबत राहणारा सुरेश श्रीमंत इंगवले (वय ४३, रा. मु. पो. मेडशिंग, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मूळ गावी व इतर ठिकाणी शोध घेऊनही अद्यापही तो फरारच आहे.लोहगाव निरगुडी रोड खांदवे बिल्डिंग येथे सुरेश इंगवले हा पंधरा दिवसांपूर्वी एका महिलेसोबत भाड्याने राहत होता. तो खुनाच्या गुन्ह्यानंतर काही दिवसांपासून पसार होता. त्याच्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी विमानतळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना या घरात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला.या महिलेचा खून करून आरोपी सुरेश पसार झाल्याचा संशय आहे. सुरेश ट्रेलर चालक असून येथील एका कंपनीत काम करीत होता. महिलेच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याने खून केला असावा, असा संशय आहे.  घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे. चिठ्ठीत एका व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. पोलिसांनी तपासासाठी घरमालक व अन्य काही व्यक्तींना ताब्यात घेतले होते. मात्र, या गंभीर गुन्ह्याचा अद्यापही तपास लागलेला नाही. या आरोपीबाबत माहिती देणार्‍यास योग्य रोख बक्षीस देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPuneपुणे