शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

निंबुत गोळीबार प्रकरणातील आरोपी गौतम काकडेला अटक, भोर परिसरातून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 12:17 IST

भोर परिसरातून काल रात्रीच्या वेळी ताब्यात घेतल्याचे समजते.....

सोमेश्वरनगर (पुणे) : निंबुत गोळीबार प्रकरणात रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाल्यानंतर गौतम काकडे फरार असल्याने संतापाची लाट उसळली होती. अखेर स्थानिक पोलीस गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुख्य आरोपी गौतम काकडे यास अटक केली आहे. भोर परिसरातून काल रात्रीच्या वेळी ताब्यात घेतल्याचे समजते.

बैलगाडा चालक-मालक संघटनेतील एक प्रमुख व्यक्ती गौतम काकडे यानी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा 'सुंदर' नावाचा बैल ३७ लाख रुपयांना खरेदी केला होता. यापैकी पाच लाख रुपये इसार देऊन बैल सोमवारी घरी आणला होता. गुरुवारी सकाळी गौतम यांनी पैसे दिले नव्हते. रात्री उर्वरित रक्कम नेण्यासाठी गौतम यांनी बोलावले होते. निंबाळकर हे पत्नी अंकिता, मुलगी अंकुरण, वैभव कदम, पिंटू जाधव यांच्यासह चारचाकीत गौतम काकडे यांच्या घरी गेले. घरासमोर बराच काळ चर्चा चालली. गौतम काकडे यांनी पैसे सकाळी देतो आता स्टॅम्पवर सही करा असे म्हटले. त्यावर रणजीत निंबाळकर यांनी पैसे द्या नाहीतर इसार परत घेऊन बैल परत द्या असे म्हणणे मांडले. याचे पर्यवसन वादात झाले.

याप्रसंगी गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी पिस्तुलातून थेट रणजित यांच्यावर गोळी झाडली. उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे रणजीत यांचा मृत्यू झाला. यामुळे आधी हत्येचा गुन्हा दाखल झाला होता त्याऐवजी आरोपींवर आता खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत्यूची बातमी समजताच बैलगाडा क्षेत्रातील निंबाळकर यांचे असंख्य चाहते, त्यांच्या अकादमीचे विद्यार्थी, नातेवाईक संतप्त झाले होते.

पोलिसांनी घटनेदिवशीच गोळीबार करणारा आरोपी गौरव आणि ज्यांच्या नावे पिस्तुल आहे ते सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे याना अटक केली. दोघांना पोलिस कोठडीही मिळाली आहे. मात्र गौतम काकडे फरार झाला होता.

'फरार आरोपीस अटक करून कडक शासन करा' या मागणीसाठी हजारापेक्षा अधिक लोकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर धाव घेतली होती. तसेच रणजित यांची पत्नी अंकिता यांनीही आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काकडे यांच्या निवासस्थानी जाण्याचा काही आंदोलकांनी इशारा दिला होता. यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण आला होता. आठ पथके गौतमच्या मागावर होती. अखेर पोलिसाना आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने भोर येथून रविवारी रात्री उशिरा अटक केल्याचे, पोलिस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBaramatiबारामतीPuneपुणे