शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

चाकण पोलीस ठाण्याच्या कक्षात आरोपींची मारामारी; पोलीस फिर्यादी, चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 3:15 PM

पोलीस ठाण्यामध्ये ठाणे अंमलदाराच्या कक्षात एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी आले असता दोन्ही गटातील आरोपींनी चक्क ठाणे अंमलदाराच्या कक्षातच हाणामारी केली.

ठळक मुद्देदोन्ही गटातील चौघांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलजागेच्या वादातून भावकीच्या दोन गटात भांडण तंटा

चाकण : येथील पोलीस ठाण्यामध्ये ठाणे अंमलदाराच्या कक्षात एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी आले असता दोन्ही गटातील आरोपींनी चक्क ठाणे अंमलदाराच्या कक्षातच हाणामारी, शिवीगाळ व झटापट सुरु केली. त्यामुळे दोन्ही गटातील चौघांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस हवालदार हिरामण संपत सांगडे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब नारायण जाधव, संदीप शिवाजी जाधव, कैलास शांताराम जाधव व सचिन शिवाजी जाधव (सर्व रा. बिरदवडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेच्या वादातून भावकीच्या दोन गटात भांडण तंटा झाल्याने दोन्ही गटातील लोक परस्परांविरुद्ध तक्रार देण्यास आले असता दि. ११ रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास पोलीस ठाण्यातच एकमेकांना शिवीगाळ व झटापट करून हाताने मारहाण करू लागले. यावेळी त्यांना ठाणे अंमलदार प्रमोद भोसले यांनी सोडविण्याचा व समजविण्याचा प्रयत्न करूनही ते एकमेकांशी झुंज करीत राहिल्याने अखेर पोलिसांनी दोन्ही गटातील चौघांवर काल रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी उशिरा गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील लोकांमध्ये काल दि.११ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान भांडण तंटे झाले होते. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नामदेव जाधव पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे