चाकण पोलीस ठाण्याच्या कक्षात आरोपींची मारामारी; पोलीस फिर्यादी, चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 15:26 IST2018-01-12T15:15:57+5:302018-01-12T15:26:54+5:30

पोलीस ठाण्यामध्ये ठाणे अंमलदाराच्या कक्षात एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी आले असता दोन्ही गटातील आरोपींनी चक्क ठाणे अंमलदाराच्या कक्षातच हाणामारी केली.

accused fights in Chakan police station; Police Complaint, Four Offense Filed | चाकण पोलीस ठाण्याच्या कक्षात आरोपींची मारामारी; पोलीस फिर्यादी, चौघांवर गुन्हा दाखल

चाकण पोलीस ठाण्याच्या कक्षात आरोपींची मारामारी; पोलीस फिर्यादी, चौघांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देदोन्ही गटातील चौघांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलजागेच्या वादातून भावकीच्या दोन गटात भांडण तंटा

चाकण : येथील पोलीस ठाण्यामध्ये ठाणे अंमलदाराच्या कक्षात एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी आले असता दोन्ही गटातील आरोपींनी चक्क ठाणे अंमलदाराच्या कक्षातच हाणामारी, शिवीगाळ व झटापट सुरु केली. त्यामुळे दोन्ही गटातील चौघांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस हवालदार हिरामण संपत सांगडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब नारायण जाधव, संदीप शिवाजी जाधव, कैलास शांताराम जाधव व सचिन शिवाजी जाधव (सर्व रा. बिरदवडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेच्या वादातून भावकीच्या दोन गटात भांडण तंटा झाल्याने दोन्ही गटातील लोक परस्परांविरुद्ध तक्रार देण्यास आले असता दि. ११ रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास पोलीस ठाण्यातच एकमेकांना शिवीगाळ व झटापट करून हाताने मारहाण करू लागले. यावेळी त्यांना ठाणे अंमलदार प्रमोद भोसले यांनी सोडविण्याचा व समजविण्याचा प्रयत्न करूनही ते एकमेकांशी झुंज करीत राहिल्याने अखेर पोलिसांनी दोन्ही गटातील चौघांवर काल रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी उशिरा गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील लोकांमध्ये काल दि.११ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान भांडण तंटे झाले होते. 
पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नामदेव जाधव पुढील तपास करीत आहेत.

Web Title: accused fights in Chakan police station; Police Complaint, Four Offense Filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे