शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

आरोपी डॉ. अजय तावरेच्या नियुक्तीसाठी आमदार टिंगरेंची शिफारस अन् मंत्री मुश्रीफांचा 'शिक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 18:06 IST

कारचालक 'बाळा'चा रक्त तपासणी अहवाल बदलल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते...

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उजेडात आली होती. कारचालक 'बाळा'चा रक्त तपासणी अहवाल बदलल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले होते. याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि सीएमओ (कॅज्युअलटी विभाग) डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा अटक केली होती. या घटनेनंतर पुण्यासह राज्यात खळबळ माजली होती.

या प्रकरणात आणखी एक बाब समोर आली आहे. आरोपी तावरेची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्याची शिफारस पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्यानंतर तावरेची ससूनच्या अधिक्षकपती नियुक्ती करण्यात आली होती. त्या शिफारसीचे पत्र माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

आमदार सुनिल टिंगरे यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, "मा. महोदय, उपरोक्त विषयान्वये माझ्या परिचयाचे डॉ. अजय अ. तावरे हे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्यायवैद्यकशास्त्र विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक या पदावर, ससून सर्वोपचार रुग्णालयात कोविड १९ च्या काळात उत्तम कर्तव्य पार पाडलेले आहे. तरी डॉ. अजय अ. तावरे यांच्याकडे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाचा अतिरीक्त कार्यभार देणेबाबत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही व्हावी हि विनंती". अशी विनंती आमदार टिंगरेंनी मंत्री मुश्रीफांकडे केली होती. त्यानंतर मंत्री महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तावरेची नियुक्ती ससुनच्या अधिक्षकपदी केली होती.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातही ‘ससून’चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर याचे नाव समोर आले होते, अन्य एका डॉक्टरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक केली आहे. पैशांच्या लालसेतून डॉक्टर मंडळीच असे कृत्य करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलिस आयुक्तांचा संशय ठरला खरा :

अपघाताच्या घटनेनंतर नियमानुसार 'बाळा'चे ब्लड सॅम्पल घेण्यात आले. मात्र, हाय प्रोफाइल केस असल्याने या प्रकरणात कोणतीही शंका मनात राहू नये यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सांगण्यावरून 'बाळा'चे दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेण्यात आले. मात्र, हे ब्लड सॅम्पल ससूनमध्ये न पाठवता खासगी लॅबला तपासणीसाठी विशेषत: डीएनए रिपोर्टसाठी पाठवले होते. रविवारी (दि. २६) पोलिसांकडे दोन्ही ब्लड रिपोर्ट आले. यामध्ये ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाख रुपयांच्या बदल्यात त्यात फेरफार केल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस आयुक्त म्हणाले...

- ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी रक्ताचे नमुने बदलले. 'बाळा'चे घेतलेले रक्त कचऱ्यात टाकून दुसऱ्या रक्ताचे नमुने तपासासाठी पाठवले.

- आम्ही संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केला आणि रक्त तपासणी अहवालातील फेरफार लक्षात आला. त्यानंतर गुन्हे शाखेने दोन डॉक्टरांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

- डॉ. तावरे हा फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख आहे, तर डॉ. हाळनोर सीएमओ (कॅज्युअलटी विभाग) विभागात नेमणुकीस आहे.

- पोलिस ब्लड रिपोर्टची वाट पाहत होते. या रिपोर्टमध्ये फेरफार होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी मुलाचे रक्ताचे दोन नमुने घेतले होते.

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हCrime Newsगुन्हेगारीHasan Mushrifहसन मुश्रीफsunil tingreसुनील टिंगरे