शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 13:10 IST

दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर यान दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने २६ मे २०१९ रोजी अटक केली होती.

ठळक मुद्देआरोपींची सीबीआय कोठडीची मुदत आज संपली

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीची मुदत आज (४जून) संपत असल्याने आरोपींना शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपासाची नेमकी दिशा काय असेल यासाठी न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.आरोपींच्या चौकशीतून मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर याने  दिलेल्या कबुली जबाबावरुन पुनाळेकर आणि भावे यांना सीबीआयने २६ मे २०१९ रोजी अटक केली होती. कळसकर याच्याच जबाबावरून केस बनविण्यात आली आहे. पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.   अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येतील आरोपी वकील संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती. न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला होता. संजीव पुनाळेकर यांनी आरोपीना गुन्ह्यात वापरलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला. हे वकिली नियमांचे उल्लंघन आहे. त्यांच्याकडून मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. त्या डेटाचे विश्लेषण करण्याचे काम अद्याप सुरू आहे. तर गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची असल्याने विक्रम भावे याच्याकडे सखोल चौकशी करायची आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्यात अनेक आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे पुढील चौकशी करण्यासाठी दोघांनाही अतिरिक्त 14 दिवस सीबीआय कोठडी द्यावी. असा युक्तिवाद सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी केला. या गुन्ह्यातील आरोपी शरद कळसकर याने दुस?्या गुन्ह्यात दिलेल्या कबुलीजबाबावरुन पुनाळेकर आणि भावे याना अटक करण्यात आली आहे. कळसकर याच्या जबाबावरून केस बनविण्यात आली आहे. आपल्या अशीलाला सल्ला देणे हा गुन्हा नाही. असे झाले तर वकिलांना आपले काम करणे अवघड होईल. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निकालांचा संदर्भ देत केलेली अटक कशी चुकीची आहे हे न्यायालयास सांगण्यात आले. तसेच अटक करण्यासाठी आवश्यक असलेले ठोस पुरावे देखील सीबीआयकडे नाहीत. दोघांवरही दाखल करण्यात आलेले गुन्हे जामीनपात्र आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा. असा युक्तीवाद बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड सुभाष झा आणि अ‍ॅड गणेश उपाध्याय यांनी केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद खोडताना सूर्यवंशी म्हणाले, योग्य चौकशी केल्यानंतरच दोघाना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्यास सांगणे हा कायदेशीर सल्ला नाही. तसेच आरोपीच्या अटकेला आव्हान करायचे असेल त्यावर सर्वोच्च न्यायालयात जावे.

 

टॅग्स :PuneपुणेCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरMurderखूनCourtन्यायालय