शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 23:57 IST

पीडित मुुलीचे शहर पोलीस ठाण्याच्या दारात उपोषण

बारामती : दहा दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल होऊनदेखील आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे. त्यामुळे पीडित मुलीने चक्क बारामती शहर पोलीस ठाण्याच्या दारातच उपोषण आरंभले आहे. २१ आॅगस्ट रोजी आरोपी कृष्णा महादेव जाधव याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल असतानादेखील आरोपी शहरात मोकाट फिरत आहे. अद्याप अटक न झाल्याने उजळ माथ्याने तो वावरत आहे. त्यामुळे पीडितेच्या जिवास धोका निर्माण झाला आहे.

आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल असूनेखील त्याला अटक का होत नाही, याचे गुढ समजत नाही. मुख्यमंत्र्यांसह पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांना अर्ज निवेदन पाठविले होते. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. परंतु आरोपी मोकाट फिरत आहे. हक्कासाठी, न्यायासाठी माझे उपोषण सुरू असून आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी पीडित अल्पवयीन मुलीने केली आहे.काही दिवसांपूर्वीच बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील अल्पवयीन मुलीने रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी निर्भया पथक, पोलीस पथकामार्फत कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी मात्र उजळ माथ्याने मोकाट फिरत आहे. त्याला अटक करण्यासाठी अल्पवयीन पीडितेवर पोलीस ठाण्याच्या दारातच उपोषण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रोडरोमिओंवर कारवाई करणारे पोलीस अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक केव्हा करणार, हा प्रश्न संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी