शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

नियमानुसार काम म्हणजे हिटलरशाही कशी? - तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:22 IST

प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले, शिस्तभंगाची कारवाई केली म्हणजे हिटरलशाही आहे का? आतापर्यंत कोणत्याही नियम, रचनेशिवाय काम चालत होते. कोणतेही व्हिजन, मिशन नव्हते. अनेकांची मनमानी बंद केली. बससेवेत लक्षणीय बदल होत असून मार्गावरील बस, उत्पन्न, प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

पुणे - प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले, शिस्तभंगाची कारवाई केली म्हणजे हिटरलशाही आहे का? आतापर्यंत कोणत्याही नियम, रचनेशिवाय काम चालत होते. कोणतेही व्हिजन, मिशन नव्हते. अनेकांची मनमानी बंद केली. बससेवेत लक्षणीय बदल होत असून मार्गावरील बस, उत्पन्न, प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मग ही हिटलरशाही कशी़, असा सवाल पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोणीही काहीही म्हटले तरी यापुढील काळातही नियमानुसार काम करूनच ‘पीएमपी’ सक्षम करणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.‘पीएमपी’ची कमान मुंढे यांच्या हाती येणार असल्याने दहा महिन्यांपूर्वी ‘पीएमपी’तील कामगार संघटना तसेच प्रवासी संघटनांकडून आनंद व्यक्त करण्यात आला होता. पण मुंढे यांनी मागील दहा महिन्यांत घेतलेल्या विविध निर्णयांमुळे तसेच कर्मचाºयांवरील कारवाईच्या धडाक्यामुळे सर्व संघटना नाराज झाल्या आहेत. पास दरवाढीसह प्रवाशांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याबद्दल प्रवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे, तर अनेक कर्मचाºयांची बडतर्फी, निलंबन बेकायदेशीरपणे केले जात असल्याचा आरोप कामगार संघटनांंकडून केला जात आहे. त्यातच काहींनी मुंढे यांच्यावर हिटलरशाहीचा आरोप केला होता. त्याला मुंढे यांनी आतापर्यंत केलेल्या सुधारणांचा आलेख मांडून सडेतोड उत्तर दिले आहे.मुंढे म्हणाले, ‘पीएमपी’चा पदभार स्वीकारला तेव्हा ‘कंपनी’ म्हणून कोणतीही रचनाच अस्तित्वात नव्हती. अधिकारी, कर्मचाºयांची उतरंड, त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, पदोन्नती याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. कामाच्या तुलनेत अनेक कर्मचारी अतिरिक्त होते. त्यांच्या कामाच्या नियोजनात ढिसाळपणा होता. आधीचे प्रशासन हे कर्मचारीपूरक होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रशासनात अनेक बदल करावे लागले. ‘स्टाफिंग पॅटर्न’ तयार करण्यात आला. ही रचना शास्त्रीयदृष्ट्या सक्षम करण्यात आली. आस्थापना आराखडा तयार करण्यात आलेला नव्हता. हा आराखडा तयार करून भरती, पदोन्नतीचे नियम तयार करण्यात आले. विविध ५९ संवर्ग करण्यात आले असून प्रत्येकाचे ‘जॉब चार्ट’ तयार करण्यात आले आहे. प्रत्येक संवर्गाची जबाबदारी, कर्तव्य निश्चित केली आहे. त्यानुसार प्रत्येकाला काम ठरवून देण्यात आले आहे. यापूर्वी असे काहीच नव्हते.मनमानी बंदपूर्वी अनेक अधिकारी व कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करीत होते. आता कामात सुसूत्रता आणून प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने ही मनमानी बंद झाली आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील ११०० बस मार्गावर आणण्यात यश मिळाले आहे. मार्गांचे सुसूत्रीकरण, आयटीएमएस यंत्रणा, नवीन मार्ग, पासचे सुसूत्रीकरण यांसह विविध बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पीएमपीचा तोटा कमी होण्याबरोबरच प्रवासीही वाढले आहेत, असे मुंढे यांनी सांगितले.आतापर्यंत कोणत्याही नियमाद्वारे काम चालत नव्हते. ते काम नियमानुसार सुरू करण्यात आले आहे. ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने अंमलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत कर्मचाºयांवर होत असलेल्या कारवाया अचानक नाहीत. पूर्वी कर्मचाºयांचे रेकॉर्डच ठेवले जात नव्हते. आता रेकॉर्डनुसार कारवाई सुरू आहे. शिस्तभंग, नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई केली जात आहे. ‘पीएमपी’ ही कंपनी असून त्यानुसार काम करायचे नाही का? शिस्तभंगाची कारवाई म्हणजे हिटलरशाही आहे का? असे प्रश्न मुंढे यांनी उपस्थित केले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेPMPMLपीएमपीएमएल