शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राखी बांधायला आलेल्या बहिणीचा भावासमोरच अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 20:52 IST

ही दुर्दैवी घटना पुणे सोलापूर महामार्गावर बोरी भडक चंदनवाडी (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली...

यवत (पुणे) : राखी बांधायला आलेल्या बहिणीचा भावासमोरच अपघाती मृत्यू झाला असून ही दुर्दैवी घटना पुणे सोलापूर महामार्गावर बोरी भडक चंदनवाडी (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. वैशाली नितीन शेंडगे (वय २६, रा. हडपसर मंतरवाडी, ता. हवेली) असे मृत्यू पडलेल्या बहिणीचे नाव आहे.

बहीण राखी बांधण्यासाठी आली असता तिचा भाऊ विलास विश्वनाथ कोपनर (वय ३४, रा. बोरीभडक कोपनर डेअरीजवळ, ता. दौंड) हे तिला घेऊन दुचाकी (क्र. एमएच ४२ डी ९५६) वरून पुणे- सोलापूर महामार्गावरून जात होते. हॉटेल जयभवानीसमोर आले असताना पाठीमागून आलेल्या पुणेकडून सोलापूरकडे जाणाऱ्या कार (क्र. एमएच ४२ झेड ४१४७) सफारी गाडीने जोरात धडक दिली, तसेच वैशाली हिला गाडीने फरफटत ओढत नेले. डोक्याला, हातापायाला किरकोळ व गंभीर मार लागल्याने व ती जागीच बेशुद्ध पडल्याने तेथील लोकांनी रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी कार चालक मोहन रावसाहेब डोंबे (रा. खोर डोंबेवाडी, ता. दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात