शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती बालाजी देवदर्शनाला निघालेल्या थेऊर फाटा येथील तरुणाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 11:02 IST

अपघातात तरुणाच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने उपचार सुरु असताना मृत्यू

थेऊर: तिरुपती बालाजी येथे देवदर्शनाला निघालेल्या थेऊर फाटा येथील १९ वर्षीय तरुणाचा अपघातातमृत्यू झाला आहे. तर आणखी तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अथर्व सचिन धुमाळ (वय १९, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे अपघातातमृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी २५ फेब्रुवारीला झाला होता. अथर्व याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (ता. ४) त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व व त्याचे मित्र हे चारचाकी गाडीतून आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले तिरुमाला तिरुपती बालाजी येथे देवदर्शनाला चारचाकी गाडीतून निघाले होते. कर्नाटक राज्यातील बेंगलोरच्या जवळ असलेल्या चित्रदुर्ग जवळील हिरीवूर या गावाजवळ गेले असता त्यांच्या चारचाकी गाडीने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला जोरदार धडक दिली.

या अपघातात अथर्व याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला होता. त्याला तेथीलच एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. या अपघातातील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, अथर्व याच्या जाण्याने कुंजीरवाडी परिसरावर शोककळा पसरली होती. येथील श्रीनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ यांचा तो पुतण्या होत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलtirupati-pcतिरुपती