शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वारजे उड्डाणपुलावर भीषण अपघात ; कारचा झाला चेंदामेंदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 13:15 IST

पुणे- सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर झाला.

पुणेपुणे सातारा महामार्गावर वारजे उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका कारचा चक्काचूर झाला आहे. यात कारचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाेन ट्रकच्यामध्ये सापडल्याने कारचा चक्काचूर झाला. 

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांदणी चाैकाकडून कात्रच्या दिशेने जाताना आज सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. पुणे सातारा महामार्गावरील पाॅप्युलर पुल ओलांडल्यानंतर हा अपघात झाला. कारच्या पुढे असणाऱ्या टॅंकरने अचानक ब्रेक दाबला. कारच्या चालकाने प्रसंगावधान राखत कार नियंत्रणात आणली. परंतु उतार असल्याने कारच्या मागून एक कंटनेर जाेरात आला आणि त्याने कारचा धडक दिली. ही धडक इतकी भीषण हाेती की कार पुढील टॅंकरवर जाऊन जाेरात आदळली. दाेन्ही जड वाहनांच्या मध्ये कार सापडल्याने कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने कारमध्ये एअरबॅग असल्याने कार चालकाचे प्राण वाचू शकले. धडक बसल्यानंतर दाेन्ही जड वाहनांचे चालक वारजे पाेलीस चाैकीत जात त्यांनी पाेलिसांना अपघाताची माहिती दिली. पाेलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल हाेत जखमी चालकाला रुग्णालयात दाखल केले. 

अपघात इतका जाेरदार हाेता कारचा चालक वाचू शकणार नाही असे प्रत्यक्षदर्शींना वाटले. परंतु कारमध्ये असणाऱ्या एअरबॅगमुळे चालकाचे प्राण वाचले. दरम्यान या अपघातामुळे माेठी वाहतूक काेंडी या भागात झाली हाेती. पाेलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कारला बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

नागरिकांची असंवेदनशीलताअपघात झाल्यानंतर कारचा चेंदामेदा झाला हाेता. दाेन्ही वाहनांच्या मध्ये कार अडकली हाेती. कारचा चालक वाचवा वाचवा असे ओरडत असताना अपघाताच्या ठिकाणी असणारे काही प्रत्यक्षदर्शी व्हिडीओ शुटींग काढण्यात व्यस्त हाेते. त्यापैकी काेणीही चालकाचे प्राण वाचविण्यासाठी पुढे आले नाही. अखेर पाेलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाेलिसांनी चालकाला कारमधून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडी