शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वालचंदनगर-नातेपुते मार्गावर अपघात; नीरा नदीत बुडाली चारचाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 12:30 IST

कळंबोली (ता.सोलापूर) नजीकच्या नीरा नदी पुलावरील घटना....

कुरवली (पुणे) : इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर-नातेपुते मार्गावरील कळंबोली (ता.सोलापूर) नजीकच्या नीरा नदी पुलावर समोरून येणाऱ्या वाहनाच्या लाइटच्या तीव्र प्रकाशामुळे संरक्षण कठडा तोडून स्विफ्ट गाडी नीरा नदीत बुडाली. या अपघातात दोघे जण बचावले असून, यात गाडीचे मोठे नुकसान झाले.

वालचंदनगर पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, खबर देणार सागर अशोक घोडके वय २८ (रा.सांगली नं. १, ता.करमाळा जि.सोलापूर ) त्यांचे मेहुणे सुशांत विष्णू राजेमाने (रा.कळंबोली ता.इंदापूर) हे दोघे या स्विफ्ट गाडीमध्ये होते. आपले काम उरकून आज मंगळवार, दि.०३ रोजी पहाटे ३ च्या सुमारास घोडके त्यांच्या मेहुण्यास कळंबोली येथे सोडण्यासाठी इंदापूर, जंक्शन, वालचंदनगर या मार्गे कळंबोली येथे वालचंदनगर नातेपुते रोडने जात होते. प्रवीण ढाब्याच्या नजीक विरुद्ध दिशेने नातेपुते बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाने कट मारल्याने, या वाहनाचे लाइटचा उजेडामुळे चालकाला समोरील कळंबोली पुलाचा अंदाज न आल्याने, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व स्विफ्ट कार नं. एमएच ४५ ए. क्यू ९२९३ गाडी पुलावरून खाली नदीच्या पाण्यात कोसळली.

या पुलावर काही प्रमाणात शिल्लक राहिलेल्या लोखंडी संरक्षण कठड्याला धडकून नीरा नदीच्या पाण्यात ही गाडी पडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. खबर देणार व मेहुणा असे गाडीतून बाहेर पाण्यातून पोहत नदी किनारी आले. यामध्ये पाण्यामध्ये पडून गाडीचे नुकसान झाले असून, ही गाडी दुपारी क्रेनच्या साहाय्याने नदीतून बाहेर काढण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात