शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 16:31 IST

मुंबई - बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या सेफ्टी गार्डच्या लोखंडी पाईपवरच टेम्पो गेल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

पुणे : मुंबई - बंगळुरू महामार्गावर रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या सेफ्टी गार्डच्या लोखंडी पाईपवरच टेम्पो गेल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण जखमी आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नवीन कात्रज बोगद्याजवळ घडली. चालक बालकिशन रामतरण काकाणी (वय :५० , राहणार कंटेवस्ती , शिवणे , तालुका हवेली, जिल्हा पुणे ) हे जखमी झाले असून, चालक बालकिशन यांच्याशेजारी बसलेला त्यांचा मुलगा प्रीतम बालकिशन काकाणी (वय :१७) ह्याचा जागीच मृत्यू झाला आहे.वेफर्स, कुरकुरे, फरसाण इत्यादी वस्तूचा माल घेऊन पुणेच्या दिशेने निघालेला टेम्पो (क्रमांक MH १२ PQ २८१४ ) दुपारी नवीन कात्रज बोगद्यातुन बाहेर पडण्याच्या आधीच थोडा उतार असल्याने तसेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सेफ्टी गार्डच्या लोखंडी पाईपमधून  टेम्पोची अर्धी बाजू अक्षरशः २० मीटर आत गेल्याने चालकाशेजारी बसलेल्या तरुणाच्या पोटातून लोखंडी पाईप आरपार गेला. तर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता कि पाहणाऱ्याच्या काळजाचे पाणी झाले. काही नागरिकांनी चालकाला त्वरित जवळच्या रुग्णालयात  दाखल केले असल्याचे समजते आहे. घटनेचे वृत्त समजताच भारती विद्यापिठ पोलीस ठाण्याचे मार्शल तुकाराम कदम , दत्तात्रय खपाले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी तसेच नांदेड सिटी अग्निशमन दलाचे कर्मचारी आदींनी त्वरित घटनास्थळी पोहचून मृत्यू झालेल्या तरुणाच्या पोटात गेलेला रॉड कापून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बडे व सहायक पोलीस फौजदार पठाण तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूkatrajकात्रज