शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पो व दुचाकीची धडक, 1 विद्यार्थी ठार 2 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 08:25 IST

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे टेम्पो व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथे टेम्पो व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील दोन जण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री सायंकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मयत व जखमी हे लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी आहेत.शुभम वाल्मिक मोरे (वय 26, रा. जालना) असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव असून त्याच्या सोबत असलेले शुभम विलास जाधव (वय 20) व विक्की दयानंद वाघमारे (वय 22) हे जखमी झाले आहेत. मयत शुभमचा मित्र शुभम सुनिल शेडगे याने लोणावळा शहर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड मह‍विद्यालयाचे 20 ते 25 विद्यार्थी त्यांचे मित्र दर्शन सिरोया व ऋषीकेश देशमुख यांच्या वाढदिवसाचे जेवण करण्याकरिता दुचाकी गाड्यांवरुन खोपोलीला गेले होते. जेवण करुन पुन्हा लोणावळ्यात परतत असताना खंडाळ्यातील कोहिनूर पॅलेसच्या गेटसमोर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीला पुण्याहून मुंबईच्या दिशेने वेगात निघालेल्या टेम्पोची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दुचाकीवरील जखमी झालेल्या तिघांनाही त्यांच्या मित्रांनी लोणावळ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी शुभम मोरे याच्या डोक्याला गंभिर मार लागल्याने त्याचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस अधिकचा तपास करत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईPuneपुणे