शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूरला जाताना इंदापूर येथे अपघात; 13 गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 20:52 IST

इंदापूर : पुण्याकडून तुळजापूरला जात इंदापूर शहराच्या बाह्यवळण येथील वैष्णवी ढाब्याजवळ पिकअपला कंटेनरने मागील बाजूकडून मंगळवार दि. २५ रोजी दुपारी ...

इंदापूर : पुण्याकडून तुळजापूरला जात इंदापूर शहराच्या बाह्यवळण येथील वैष्णवी ढाब्याजवळ पिकअपला कंटेनरने मागील बाजूकडून मंगळवार दि. २५ रोजी दुपारी २ वाजता धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये पिकअप गाडीतील तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत संतोष संपत रायकर ( वय ३५ ) रा. हंगेवाडी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये पिकअप नं. एम. एच. १६ सी. सी. ३४०५ चालक साहेबराव प्रभु रायकर हा गावातील लोकांना घेवुन तुळजापुर येथे जात असताना मौजे इंदापुर गावचे हद्दित वैष्णवी ढाब्याजवळ महिंद्रा पिकअप थांबली असता त्याच्या पाठीमागुन येणारे बल्क कुलर कनटेनर नंबर एम. एच. ४६ ए. आर. ५३८२ वरील चालकाने ठोस मारल्याने अपघात झाला आहे. त्यावरील चालक अपघातातील जखमींना उपचाराची मदत न करता अपघात करुन निघुन गेला, तसेच अपघातात पिकअप जिपमधील सिताराम तबा रायकर, ( वय ६५), सुभद्राबाई दशरथ रायकर, संजय विठ्ठल रासकर, रंजना संजय रासकर, चांदन दत्तात्रय रायकर, जयश शरद रायकर, समुध्दी शरद रायकर, साक्षांत सावता रायकर, मंदा सावता रायकर, शरद दशरथ रायकर, जयश्री शरद रायकर, रखमाबाई विठ्ठल रायकर यांना गंभीर मार लागला असुन त्यांना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात