शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पुन्हा अपघात; डांबरीकरणाच्या गाडीचा ब्रेक फेल, महिला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 15:26 IST

पुण्यातील शिवणे येथील शिंदे पुलावर डांबरीकरण करणार्‍या गाडीचा ब्रेक फेल झाला. ही गाडी दुचाकीस्वार महिलेच्या अंगावर गेली. यात महिला गंभीर असून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात एक महिला गंभीरब्रेक फेल होऊन व नेमका रस्त्याच्या उतारावर अपघात घडल्याने वारजे भागात चिंतेचे वातावरण

वारजे : वारज्यात कालच्या पीएमपी ब्रेक फेलची घटना ताजी असताना आज शुक्रवारी एका डांबरचे मिश्रण घेऊन जाणार्‍या वाहनांचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात एक महिला गंभीर झाली आहे. तर दुचाकी चालवणारा त्यांचा मुलगा थोडक्यात बचावला.कौशल्या दत्तात्रय मोहोळ (वय ५०, रा. बहुली) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे उत्तमनगर भागात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या जोरात चालू आहे. त्याच कामासाठी हा डांबर मिक्स करणारा टेम्पो उत्तमनगरच्या दिशेने जात असताना शिंदे पुलावर टेम्पोचा ब्रेक फेल झाला. या भागात वाहनांची गर्दी असल्याने अवाढव्य वाहनावर चालकाला ताबा मिळवता न आल्याने हा टेम्पो गर्दीत घुसला. यात दुचाकीवर मागे बसलेल्या कौशल्या या टेम्पोच्या खाली गेल्याने त्यांना जबर मार लागला. अपघातस्थळी नागरिकांनी त्यांना बाहेर काढून रुग्णवाहिकेची वाट न पाहता शाळेच्या विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनाने नजिकच्या खासगी रुग्णालयात पाठवले.  जखमींना मदत करण्यासाठी व अपघातस्थळी वाहतूककोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस व उत्तमनगर पोलिसांना स्थानिक कार्यकर्त्यांनीदेखील मोठी मदत केली. यात नगरसेवक सचिन दोडके, कुणाल दांगट, प्रवीण दांगट, अतुल दांगट, हरिष मुनोत, राकेश पोखरणा, विष्णुपंत देशमुख, सागर जावळकर, रामालाला जैन आदींनी सहकार्य केले. यावेळी रस्त्यात अडकलेल्या टेम्पोला क्रेनच्या साह्याने पोलीस व नागरिकांनी बाजूला घेतले. या घटनेत दुचाकीचालकास किरकोळ मार लागल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. दरम्यान सलग दोन दिवस ब्रेक फेल होऊन व नेमका रस्त्याच्या उतारावर अपघात घडल्याने वारजे भागात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातCrimeगुन्हाPuneपुणे