काळानुरुप बदल स्वीकारुन युध्दपध्दतीसाठी स्वत:ला सज्ज ठेवावे : लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 04:32 PM2019-01-31T16:32:20+5:302019-01-31T16:37:48+5:30

काळानुरूप होणारे बदल स्वीकारून, आपणही स्वत:ला विकसित केले पाहिजे, असा सल्ला लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे यांनी दिला. 

accept change with time keep yourself ready for the war: lieutenant general Ashok Ambre | काळानुरुप बदल स्वीकारुन युध्दपध्दतीसाठी स्वत:ला सज्ज ठेवावे : लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे 

काळानुरुप बदल स्वीकारुन युध्दपध्दतीसाठी स्वत:ला सज्ज ठेवावे : लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे 

googlenewsNext
ठळक मुद्देजंगी पलटणला २५० वर्षे पूर्ण 

पुणे : तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या युद्धपद्धतीमुळे पूर्वसूचनेचा अवधी कमी झाला आहे. त्यामुळे युद्धाच्या तयारीसाठी फारसा अवधी सैन्याकडे उपलब्ध नसतो. अशा प्रकारच्या युद्धपद्धतीला सामोरे जाण्यासाठी आपणदेखील स्वत:ला सज्ज ठेवले पाहिजे. काळानुरूप होणारे बदल स्वीकारून, आपणही स्वत:ला विकसित केले पाहिजे, असा सल्ला लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे यांनी दिला. 
लष्कराच्या मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंट म्हणजेच जंगी पलटनच्या स्थापनेला यंदा २५० वर्षे पूर्ण होताहेत. यानिमित्त लष्करातर्फे आयोजित कार्यक्रमात या सैन्य तुकडीचे माजी सैनिक आणि वीरनारी यांना सन्मानित करण्यात आले. या रेजिमेंटचे सर्वोच्च पदावर कार्यरत असणारे लेफ्टनंट जनरल आम्ब्रे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 
आम्ब्रे म्हणाले, देशाच्या लष्करी इतिहासात जंगी पलटनची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. पहिले महायुद्ध, सियाचीन येथील लढाई अशा महत्त्वपूर्ण लढायांमध्ये पलटनने अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या तुकडीच्या पूर्वजांनी आपल्या शौर्य, साहस व कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक मोहिमा यशस्वी करत, पलटनचा स्तर उंचावला आहे. त्यामुळेच या पलटनमध्ये सैनिक म्हणून निवड होणे ही अतिशय अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे.
आम्ब्रे यांनी पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण ठेवत तो कायम ठेवण्याची जबाबदारी आताच्या जवानांवर आहे. हा इतिहात सदैव स्मरणात ठेवून त्याला आणखी दैदीप्यमान कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली.  
मुलामुळे युनिटचा सन्मान वाढला...
माझ्या निवृत्तीनंतर माझा मुलगा माझ्याच जागी फर्स्ट मराठांच्या जंगी पलटणमध्ये सहभागी झाला. त्याच्या लष्करातील सेवेला दोन वर्षे पूर्ण झाले होते. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी श्रीलंका येथे एलटीटीईच्या विरोधात लढण्यासाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला. 
यात माझा मुलगा बाजीराव तरटे याचीही निवड झाली. माज्याच युनिटमध्ये असल्याने माझे वरिष्ठ भेटल्यास माझा नमस्कार सांग असे त्याला सांगितले. मात्र, शांतीसेनेत असताना त्याला वीरमरण आले. त्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्याला गौरवण्यात आले. माज्या मुलामुळे माज्या युनिटचा सन्मान वाढला याचा मला गौरव आहे, असे गौरवोद्गार निवृत्त सैनिक दत्तात्रेय तरते यांनी काढले. 
........................
वीरमाता, वीरनारी, वीर पित्यांचा सत्कार
फर्स्ट मराठा लाईट इन्फ न्ट्रीला २५० वर्षे पूर्ण झाली. या दैदीप्यमान काळात या बटालियनने अनेक युद्धात सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली. १९४७, १९६२ तसेच १९७१, आॅपरेशन पवन या सारख्या युध्दांमधे देशासाठी वीरगती प्राप्त कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्तीत वीरमाता, वीरनारी आणि वीर पित्यांना आपल्या स्वकीयांच्या आठवणीने आणि त्यांच्या पराक्रमाने उर भरून आला.
..................
11 डिसेंबर 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धात आमच्या जमालपूर आणि कामालपूर ताब्यात घेण्यासाठी  चढाई केली. यावेळी आमचा सामना तेथे तैनात असलेल्या 31 बलुच या पाकिस्तानी तुकडीशी झाला. आम्ही जांबलपूरला चारही बाजूने घेरले. यावेळी 31 बलुच रेजिमेंटचे कामांडन्ट कर्नल सुलतान अहमद यांना शरण येणासाठी पत्र पाठविले. मात्र अहमद यांनी त्या पाकिटात बंदुकीची होळी पाठवून उद्धभूमीत भेटु असे सूतोवाच केले. यावेळी आम्ही हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजच जय घोष करत शत्रूच्या रेजिमेंट वर तुटून पडलो.

....................
 जंगी पलटणने अतुलनीय शौर्य दाखवत जमालपूर ताब्यात घेतले,ह्णअशी आठवण या युद्धात सहभागी झालेले लातूरच्या मंगलगिरी यांनी  सांगितली. आता मला निवृत्त होऊन ३१ वर्ष झाली, पण ह्यजंगी पलटणने माझी आठवण ठेवली आणि मला इथे बोलावले याचे समाधान आहे, असेही मंगलगिरी यांनी सांगितले.

    

Web Title: accept change with time keep yourself ready for the war: lieutenant general Ashok Ambre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे