द्रुतगती महामार्गावर चोरीत ७५ हजारांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: June 17, 2014 03:07 IST2014-06-17T03:07:00+5:302014-06-17T03:07:00+5:30

ताजे गावच्या हद्दीतील द्रुतगती मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे पावणेतीनला महामार्गावर चोरट्यांनी महिलेला मारहाण

On the Accelerated Highway, 75 thousand rupees were left to the lion | द्रुतगती महामार्गावर चोरीत ७५ हजारांचा ऐवज लंपास

द्रुतगती महामार्गावर चोरीत ७५ हजारांचा ऐवज लंपास

वडगाव मावळ : ताजे गावच्या हद्दीतील द्रुतगती मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे पावणेतीनला महामार्गावर चोरट्यांनी महिलेला मारहाण करून आणि मोटारीच्या काचा तोडून रोख ७५ हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित माळी (वय ४२, रा. खराडी, पुणे) हे पत्नी रेशुसह मुंबईवरून पुण्याला निघाले होते. त्यांची मोटार ताजेगावच्या हद्दीतील पेट्रोलपंपाजवळ आली असता, माळी हे मोटार द्रुतगती महामार्गावर बाजूला उभी करून महामार्ग ओलांडून पाण्याची बाटली आणण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांची पत्नी रेशु मोटारीमध्ये बसलेल्या होत्या. अचानक अज्ञात चार चोरटे आले. त्यांनी हातात लोखंडी रॉड घेऊन मोटारीची काच फोडली. तसेच रेशु यांना किरकोळ मारहाण केली.
मोटारीमध्ये ठेवलेल्या पर्समधून रोख ७५ हजार रुपयांची रक्कम घेउन पसार झाले.
याबाबतची फिर्याद रेशु माळी यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये दिली. सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. निंबाळकर तपास करीत आहेत.(वार्ताहर)
महिला जखमी
नेहरूनगर : येथील झीरो बॉईज चौकात दुचाकीला मागून मोटार धडकल्यामुळे एक महिला जखमी झाली. अपघातानंतर मोटारचालक फरारी झाला. ही घटना रविवारी रात्री ८च्या सुमारास घडली. माधुरी राजेंद्र शर्मा (वय ४५, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र जगताप हे पत्नी माधुरी व लहान मुलगा यांच्या समवेत झीरो बॉईज चौकाजवळून जात होत्या. याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने दुचाकीला धडक दिली. (वार्ताहर)

Web Title: On the Accelerated Highway, 75 thousand rupees were left to the lion