शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

एसी बंदने शिवशाहीत जीव टांगणीला : प्रवाशांना मनस्ताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 21:11 IST

खेड-शिवापुर टोलनाका येईपर्यंत एसी सुरू न झाल्याने प्रवाशांची घुसमट

ठळक मुद्दे पुणे ते सांगली प्रवासाला लागले सात तासअखेर दुसऱ्या शिवशाहीने प्रवाशांना करण्यात आले रवाना

पुणे : सांगलीला जाणारे प्रवासी तिकीट काढून बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये चढले. बस निघाल्यानंतर एसी बंद असल्याचे समजले. याबाबत चालकाला हटकल्यानंतर एसी बंद असून पुढे काही वेळातच दुरूस्ती केली जाईल, असे सांगितले. पण खेड-शिवापुर टोलनाका येईपर्यंत एसी सुरू न झाल्याने प्रवाशांची घुसमट झाली. अखेर दुसऱ्या शिवशाहीने प्रवाशांना रवाना करण्यात आले. या प्रकारामुळेप्रवाशांना सात तासांचा प्रवास घडला.आरामदायी वातानुकूलित शिवशाही बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. पण या बसबाबत प्रवाशांच्या अनेक तक्रारीही समोर येत आहेत. एसटीच्या ताफ्यात शिवशाही दाखल झाल्यापासून सातत्याने अपघात घडत आहेत. तसेच काही तांत्रिक बिघाडामुळे वातानुकूलित यंत्रणा बंद पडण्याचे प्रकारही घडत आहेत. शुक्रवारी सांगलीला जाणाऱ्या प्रवाशांचा याचा अनुभव आला. ही बस स्वारगेट बसस्थानकातून दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास सुटली. पण बस निघण्यापूर्वीच वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांना चालकाला एसी सुरू करण्याची विनंती केली. पण या यंत्रणेची एक वायर तुटली असून कात्रजच्या पुढे ती लगेच जोडून एसी सुरू केला जाईल, असे चालकाने सांगितले. या उत्तरावर प्रवासीही निशब्द झाले. एसी यंत्रणेमुळे बसच्या सर्व काचा, दरवाजा बंद होते. केवळ छतावर हवेसाठी थोडी जागा खुली केली होती. पण ती पुरेशी नव्हती. त्यामुळे प्रवाशांची घुसमट सुरू झाली.बस कात्रजमध्ये गेल्यानंतर तिथे थांबलेल्या व्यक्तीनेही दुरूस्तीस नकार दिला. त्यामुळे बस थांबवत-थांबवत शिंदेवाडीपर्यंत नेण्यात आली. तिथे एसी लगेच दुरूस्त होणार असल्याचे समजले. त्यामुळे प्रवाशांना तिथेच उतरविण्यात आले. काही वेळाने मागून दुसरी शिवशाही आली. त्या बसमध्ये चढल्यानंतर त्याचाही एसी बंद होता. त्यामुळे पुन्हा प्रवाशांना खाली उतरावे लागले. मग प्रवाशांना आधीच्याच बसमध्ये बसवून खेड-शिवापुर टोलनाक्यापर्यंत नेण्यात आले. तिथे पुन्हा प्रवाशांना खाली उतरवून दुसºया बसची वाट पाहावी लागली. काही वेळाने आलेल्या शिवशाहीमध्ये प्रवासी गेले. यामध्ये तब्बल दोन तासांचा वेळ गेला. दरवेळी पाच तासात पोहचणाºया बसला शुक्रवारी सात तास लागले.

.......

ही प्रवाशांची फसवणूकसांगलीमध्ये पतीच्या तपासणीसाठी सायंकाळी पाच वाजताची डॉक्टरांची वेळ घेतली होती. पण दोन तास विलंब झाला. बसमध्ये एसी बंद असताना याबाबत प्रवाशांना कल्पना न देता तिकीटे देण्यात आली. ही प्रवाशांची फसवणुक आहे. प्रवाशांना खुप मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत एसटी प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. - यशश्री रानडे, प्रवासी

टॅग्स :PuneपुणेShivshahiशिवशाहीSangliसांगली