अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाच जणांवर गुन्हा, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:08 IST2021-07-03T04:08:25+5:302021-07-03T04:08:25+5:30

आळेफाटा : अल्पवयीन १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Abuse of a minor girl; Five arrested, four arrested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाच जणांवर गुन्हा, चौघांना अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पाच जणांवर गुन्हा, चौघांना अटक

आळेफाटा : अल्पवयीन १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे.

आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीसोबत पाच तरुणांनी ओळख निर्माण करत धमक्या देत गेली काही महिने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. अखेर पीडित अल्पवयीन मुलीने गुरुवारी रात्री याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी निखिल पोटे (वय २०), सुजय ऊर्फ विकी पोटे (वय ३०), दयानंद टेमगिरे (वय २०), यश गाडेकर (वय २०) व बंटी ऊर्फ सुरज तीतर (वय २३, सर्व रा. आळेफाटा) यांच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चाैघांना अटक करण्यात आली आहे. तर एकजण फरार आहे. पोलिसांनी एक मोटार ताब्यात घेतली असून पोलीस निरीक्षक मधुकर पवार याबाबत तपास करत आहेत.

Web Title: Abuse of a minor girl; Five arrested, four arrested