इंदापूर तालुक्याला वैद्यकीय ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:48+5:302021-05-05T04:16:48+5:30

इंदापूर : कोरोनाच्या महामारीत सर्वत्र वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, इंदापूर तालुक्यात योग्य नियोजन केल्याने ऑक्सिजनची कसलीही ...

Abundant supply of medical oxygen to Indapur taluka | इंदापूर तालुक्याला वैद्यकीय ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा

इंदापूर तालुक्याला वैद्यकीय ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा

इंदापूर : कोरोनाच्या महामारीत सर्वत्र वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, इंदापूर तालुक्यात योग्य नियोजन केल्याने ऑक्सिजनची कसलीही अडचण निर्माण झाली नाही. वैद्यकीय ऑक्सिजनचा तालुक्याला मुबलक प्रमाणात पुरवठा होत असल्याने, आजही ऑक्सिजनची कसलीही कमतरता भासत नाही अशी माहिती तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील भिगवण, इंदापूर, सणसर, निमगाव केतकी व एकूण १२ खासगी रुग्णालयांत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. बारामती येथूनही तालुक्याला ऑक्सिजन पुरवठा केला जातो. इंदापूर शहरातील लाईफ केअर आयसीयू सेंटर इंदापूर एकूण ऑक्सिजन बेड - ८, सिद्धिविनायक कोविड हॉस्पिटल- ३५ बेड, यशोदीप हॉस्पिटलमध्ये - २५ बेड, शांतीसागर हॉस्पिटलमध्ये २० बेड, पार्वती नर्सिंग होम २२ बेड, निलकंठ हॉस्पिटल२४ बेड, श्रेयस नर्सिंग होम ६ बेड, ओजस हॉस्पिटल १० बेड, निळकंठेश्वर आयसीयू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जंक्शन ३१ बेड, भिगवण मेडिकेअर हॉस्पिटल प्रा. लि. १५ बेड, यशोधरा आणि ट्रॉमा केअर सेंटर भिगवण ८ बेड असे इंदापूर तालुक्यात खासगी हॉस्पिटलमध्ये एकूण २०४ बेड आहेत. त्यातील १९७ बेडवर रुग्ण आहेत, तर ८ ऑक्सिजन बेड रिकामे आहेत.

इंदापूर तालुक्यातील खासगी रुग्णालयात एकूण ३१७ बेडची उपलब्धता आहे. त्यातील २०४ ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड ११, आयसीयू बेड ५ व इतर सर्वसाधारण बेड ९७ असे एकूण ३१७ बेड पैकी ३ मे २०२१ रोजी केवळ २१ बेडची उपलब्धता म्हणजे रिकामे झालेले बेड खासगी रुग्णालयात उपलब्ध होते.

तर, इंदापूर तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात १४८ बेड, निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालय ४३ बेड, भिगवण ग्रामीण रुग्णालय ३० बेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटर १६५ बेड, भिगवण कोविड केअर सेंटर १२० बेड, वालचंदनगर कोविड केअर सेंटर ४७ बेड, आय कॉलेज कोविड केअर सेंटर ६० बेड, बावडा कोविड केअर सेंटर ३० बेड असे एकूण शासकीय कोविड केअर सेंटरला एकूण ६४३ बेड शासकीयमध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये दररोज साधारणपणे ६० ते ७० बेड रिकामे होतात.

यामध्ये इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात एकूण १२० ऑक्सिजन बेड आहेत, निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयात - ३० बेड, भिगवण ग्रामीण रुग्णालयात - २० असे एकूण १७० ऑक्सिजन बेड शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत, तर बावडा ग्रामीण रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेडची तयारी चालू आहे. खासगी व शासकीय मिळून तालुक्यात एकूण ४२५ ऑक्सिजन बेडची उपलब्धता आहे.

इंदापूर तालुक्यात खासगी रुग्णालयात एकूण ३१७ व शासकीय रुग्णालयात व कोविड केअर सेंटर मिळून एकूण ६४३ व इतर ठिकाणी ४१ असे एकूण १००१ बेड तालुक्यात उपलब्ध आहेत.

मागील आठवड्यात दररोज ३०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत असल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, सध्या कोरोना आटोक्यात येत आहे. त्याचबरोबर दररोज १५० पेक्षा अधिक रुग्ण बरे होवून घरी जात आहेत. त्यामुळे थोडा दिलास मिळत आहे. ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाले नसल्याचेही तहसीलदार ठोंबरे यांनी सांगितले.

ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही

इंदापूर तालुक्यात आजतागायात १२ हजार ५०० दरम्यान रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामध्ये शहरी व ग्रामीण भागातील एकूण ८० टक्क्यांपर्यंत रुग्ण बरे होण्याची सरासरी आहे. आजतागायत एकूण २२८ रुग्णांचा तालुक्यात मृत्यु झाला आहे. तर त्यातील एकही रुग्णाचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झालेला नाही. त्यामुळे आरोग्य व महसूल प्रशासन उत्कृष्ट सेवा बजावत आहेत. असे स्पष्ट शब्दात तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी सांगितले.

Web Title: Abundant supply of medical oxygen to Indapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.