शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या सहा हजारांहून अधिक फेऱ्या रद्द; उत्पन्नाचा नीच्चांक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 21:10 IST

सुमारे ५७५ बस पुढील पंधरा दिवस मार्गावर येणार नाहीत.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा प्रभाव वाढू लागल्याने शहरातील शाळा व महाविद्यालये बंद ब्रेकडाऊन किंवा बस उपलब्ध न झाल्याने दररोज ३ ते ४ हजार फेऱ्या रद्द मागील काही दिवसांपासून पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात मोठी घट

पुणे : शहरातील गर्दी कमी करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसच्या दैनंदिन फेऱ्या सुमारे सहा हजारांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून (दि. १७) केवळ गर्दीच्या वेळी सुमारे ११०० बसच मार्गावर असतील. सुमारे ५७५ बस पुढील पंधरा दिवस मार्गावर येणार नाहीत, अशी माहिती पीएमपी अधिकाऱ्यांनी दिली.कोरोना विषाणूचा प्रभाव वाढू लागल्याने शहरातील शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. तसेच अनेक खासगी कंपन्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली आहे. बाजारपेठाही तीन दिवस बंद केल्याने कामगारही घरीच आहेत. त्याचा फटका पीएमपी बससेवेला बसू लागला आहे. त्यामुळे प्रवासीसंख्या घटली आहे. त्यातच आता जिल्हा प्रशासनाने बसफेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पीएमपीच्या १५५० ते १६५० बसच्या माध्यमातून दररोज सुमारे २१ हजार फेऱ्या होतात. ब्रेकडाऊन किंवा बस उपलब्ध न झाल्याने दररोज ३ ते ४ हजार फेऱ्या रद्द होतात. आता कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी केवळ ११०५ बस मार्गावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रद्द फेऱ्यांचा आकडा ६ ते ७ हजारांवर जाणार आहे. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी बससंख्येत फारसा बदल केला जाणार नाही. दुपारी अनेक मार्गांवर गर्दी कमी असते. या मार्गांवरील फेºया रद्द करण्यात येणार आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ न देता नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी दिली.--उत्पन्नाचा नीचांकमागील काही दिवसांपासून पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नात मोठी घट झाली आहे. प्रवासी संख्येत मोठी घट झाल्याने मागील तीन-चार दिवसांत उत्पन्न ८० ते ९० लाखांपर्यंत खाली आले आहे. आणखी फेºया रद्द होणार असल्याने उत्पन्नाचा नीच्चांक होणार आहे. कमी बस मार्गावर येणार असल्याने त्याचा फटका रोजंदारीवर काम करणाºया चालक, वाहक व इतर कर्मचाºयांना बसणार आहे. त्यांना कामच मिळणार नाही, असे अधिकाºयांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे