शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कसबा मतदारसंघात उमेदवार Bigg Boss फेम अभिजीत बिचुकलेंना एकूण किती मते पडली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 1:21 PM

या निवडणुकीत आणखी एक असा उमेदवार उभा राहिला होता. जो महाराष्ट्रात कायम चर्चेत आहे.

पुणे - कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होती. भाजपाने याठिकाणी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक लढवली. यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. 

या निवडणुकीत आणखी एक असा उमेदवार उभा राहिला होता. जो महाराष्ट्रात कायम चर्चेत आहे. हा उमेदवार म्हणजे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले. अभिजित बिचुकले यांनी कसबा पेठ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला होता. त्यात अभिजीत बिचुकलेंना ४७ मते पडली आहेत. अपक्ष उमेदवार आनंद दवे यांना २९६ मते पडली तर नोटाला १,३९७ मते पडली आहेत.

विजयानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रियारवींद्र धंगेकर यांनी विजयानंतर म्हटलं की, पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडत आहे. जनतेने त्यांना स्वीकारलं नाही. आशीर्वाद घेणे ही परंपरा आहे. त्यामुळे मी १०० टक्के गिरीश बापट यांना भेटायला जाणार आहे. ५० खोके एकदम ओके हे फक्त इथेच नाही तर महाराष्ट्रात दिसतंय. आणि हे परिवर्तन राज्यभर होणार आहे. शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर असल्याचं त्यांनी सांगितले. 

कसब्यात 'कमळ' कोमजलं१९९२ ला कसब्यात पोटनिवडणूक झाली होती. त्यात काँग्रेस उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर २५ वर्षं गिरीश बापट आणि नंतर मुक्ता टिळकांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यापूर्वी १९७८ ला अरविंद लेले निवडून आले, तेव्हापासून १९८५ ची निवडणूक आणि १९९१ची पोटनिवडणूक हा अपवाद वगळता मतदारसंघ भाजपकडेच होता. कसब्यातून गिरीश बापट पाच वेळा आमदार झाले होते. या निवडणुकीत भाजपने प्रथमच ब्राह्मणेतर उमेदवार दिला होता. 

टॅग्स :abhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेkasba-peth-acकसबा पेठ