शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत तीन कोटींच्या खंडणीसाठी अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 18:10 IST

बारामती तालुक्यातील जोगवडी येथील एका जमीन खरेदीविक्री करणाºया व्यावसायिकास तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्याचा प्रयत्न त्या व्यावसायिकाच्या प्रसंगावधानतेमुळे फसला.

ठळक मुद्देआरोपींना पकडून पोलीस कोठडीत टाकण्यात जेजुरी पोलिसांना यश आले आहे. आरोपींना सासवड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.आरोपींकडून ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल अथवा कोणाची तक्रार असेल त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स. पो. नि. रामदास वाकोडे यांनी केले आहे.

जेजुरी : बारामती तालुक्यातील जोगवडी येथील एका जमीन खरेदीविक्री करणाºया व्यावसायिकास तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्याचा प्रयत्न त्या व्यावसायिकाच्या प्रसंगावधानतेमुळे फसला. आरोपींना पकडून पोलीस कोठडीत टाकण्यात जेजुरी पोलिसांना यश आले आहे. आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की येथील व्यावसायिक किरण शांताराम भोसले हे ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११.२५ वाजण्याच्या सुमारास जेजुरी येथे कामानिमित्त आले होते. यावेळी जुनी जेजुरी येथील कोळविहिरे चौकात आरोपी उदयसिंह महाराज प्रताप चव्हाण (रा. कामोठे, ता. पनवेल, नवी मुंबई), प्रवीण लालासाहेब पवार (रा. जेजुरी ता. पुरंदर) आणि शिरीष चंद्रकांत खोत (रा. मुलुंड पूर्व, मुंबई) यांनी भोसले याचे अपहरण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने ओढत नेले . माटार(एसयूव्ही ५००, एम एच ४६ पी १००८) मध्ये टाकण्याचा प्रयत्न करीत होते. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून फिर्यादी भोसले यांनी आरोपींच्या हातून स्वत:ची सुटका करून जेजुरी पोलिसांना भ्रमणध्वणीवरून संपर्क साधला. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेवून आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी भा.द.वी. कलम ३८५, ३६४ अ ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना सासवड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे स. पो. नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे-पाटील हे करीत आहेत. आरोपी हे ही जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यांच्यावर अनेकांना फसवल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपींकडून ज्यांची कोणाची फसवणूक झाली असेल अथवा कोणाची तक्रार असेल त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स. पो. नि. रामदास वाकोडे यांनी केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणेPoliceपोलिस