करोडोंची फसवणूक : मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 10:25 PM2017-09-29T22:25:19+5:302017-09-29T22:25:19+5:30

ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडी परिसरांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथकांची निर्मिती केली आहे.

Fraud of crores: Two teams of police to catch Maitreya's directors | करोडोंची फसवणूक : मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके

करोडोंची फसवणूक : मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके

Next

ठाणे : ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि भिवंडी परिसरांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांना गंडा घालून पसार झालेल्या मैत्रेयच्या संचालकांना पकडण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांकडून गुंतवणूकदारांचे जबाब घेण्याबरोबरच आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चरर्स प्रा.लि. आणि मैत्री रियलटर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीच्या संचालकांनी ठिकठिकाणी एजंट नेमून त्यांच्यामार्फत कंपनीत आकर्षक योजना असल्याची बतावणी केली. त्याद्वारे काही ठिकाणी सहा वर्षांत पैसे दुप्पट देण्याच्या तर काही ठिकाणी जमिनीमध्ये पैसे गुंतवूणक करणाºयांना चांगला मोबदला देण्याचे प्रलोभन दाखवले. याच एजंटांच्या मदतीने वर्षा सत्पाळकर (रा. विरार, पालघर), जनार्दन परुळेकर (रा. विरार, पालघर), अजित पठारे (रा. नालासोपारा, ठाणे), ज्ञानेश्वर वैद्य, लक्ष्मीकांत नार्वेकर आणि विजय तावरे तसेच इतरांनी सुमारे ५५० ते ६०० जणांची फसवणूक करून त्यांच्याकडून १० ते १५ कोटी रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे मैत्री सुवर्णसिद्धी कंपनीला अशा प्रकारच्या ठेवी स्वीकारण्याला ‘सेबी’ (सिक्युरिटी अ‍ॅण्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) यांच्याकडून निर्बंध घालण्यात आले होते. तरीही, मैत्रेय उद्योगसमूहाने गुंतवणूकदारांना अशक्यप्राय अशा तसेच आकर्षित योजनांचे आमिष दाखवून कळवा, भिवंडी, कल्याण, घोडबंदर रोड, मुंबई, नवी मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांकडून करोडो रुपयांच्या रकमा स्वीकारल्या. हे पैसे परत न करताच त्यांचा अपहार केला. आता याप्रकरणी आमदार संजय केळकर यांच्या मागणीनंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू करण्यात आला असून दोन अधिकाºयांची पथके तयार केल्याची माहिती उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

१९ वर्षात १५०० कोटींची फसवणूक
मैत्रेय ग्रुप कंपनी निरनिराळया नावाने १९९८ पासून सात ते आठ राज्यात कार्यरत होती. संचालक व मालक मधुसूदन सत्पाळकर याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी वर्षा सत्पाळकर ही हा ‘उद्योग’ सांभाळत होती. नाशिक येथे संबंधितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे बोलले जाते. गेल्या १९ वर्षाच्या कार्यकाळात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून ती रक्कम १५०० कोटीपर्यंत जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कळवा येथील २९ वर्ष बंद असलेल्या मफतलाल कंपनीच्या कामगारांच्या महिलांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतविले असून फसवणूक झाल्यामुळे त्यांना आणखीनच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
 

 

Web Title: Fraud of crores: Two teams of police to catch Maitreya's directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.