शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
2
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
3
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
4
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
5
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
6
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
7
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
8
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
9
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
10
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
11
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
12
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
13
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
14
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
15
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
16
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
17
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
18
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
19
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
20
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अबब! दौंड येथील भीमा नदीत आढळली शंकराची १ टन वजनाची पुरातन मूर्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 11:16 IST

आणखी अवशेष सापडण्याची शक्यता

दौंड : येथील भीमा नदी पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे. मूर्तीचे तोंड पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे.

दौंड-नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामातील पूल उभारला आहे. या पूलाच्या बाजूलाच दुसरा रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात ही मूर्ती सापडली. कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला ठेवली आहे. स्थानिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली आहे. मात्र, मूर्तीचे वजन जास्त असल्याने ही मूर्ती वाहून येऊ शकत नाही. ती या ठिकाणची असल्याची माहिती काही तज्ञांनी व्यक्त केली. मूर्तीच्या मुखाचा भाग सापडला असून याच परिसरात इतर अवशेषही सापडण्याची शक्यता आहे.

पुरातनकालीन मूर्ती दौंड परिसरातलीचपाण्याचा कितीही मोठा प्रवाह असला तरी १ टन दगडाच्या वजनाची मूर्ती दूरवरुन वाहून येऊ शकत नाही. फार तर इकडे तिकडे जवळ अंतरावर या मूर्तीची हालचाल पाण्याच्या प्रवाहामुळे होऊ शकते. गेल्या दोन वर्षात भीमा नदीला जोराचा पाण्याचा प्रवाह असलेला पूर आलेला नाही. त्यामुळे ही पुरातनकालीन मूर्ती या ठिकाणचीच असण्याची शक्यता आहे.

- रवींद्र जाधव, सेवा निवृत्त पाटबंधारे अभियंता

टॅग्स :daund-acदौंड