शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

चर्चा तर होणार ना! तब्बल १२५ फुटी आणि साड़े सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेला 'बॅनर'

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: December 14, 2020 2:20 PM

याआधीही पुण्यात किंवा पिंपरी चिंचवड परिसरात झालीय भन्नाट बॅनरबाजी.... 

पुणे : आजकाल प्रसिद्धी कुणाला नको असते. तसेच मिळेल तितकी प्रसिद्धी देखील सध्याच्या युगात कमीच असते. त्यात राजकारण क्षेत्र असेल तर मग काही विचारता सोय नाही. आपली सर्वत्र चर्चा झालीच पाहिजे या उद्देशाने प्रत्येकजण झपाटलेला असतो. आणि त्यात पुणे म्हटलं की भन्नाट रसायन पाहायला मिळणार हे अगदी ठरलेले असते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात अशाच एक प्रसिद्धीचा हटके फंडा चर्चेचा विषय ठरतो आहे.  

जुन्नर तालुक्यात एका राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने तब्बल १२५ फूट आकाराचा भव्यदिव्य बॅनर झळकवला आहे. तसेच यापुढील आश्चर्य म्हणजे त्यावर ६ हजार ५०० समर्थकांचे फोटो छापले आहे.त्यामुळे हा बॅनर परिसरात चर्चेचा विषय ठरतो आहे.स्थानिक पातळीवरील पब्लिसिटी स्टंट असल्याचे पण बोलले जात आहे. तसेच बॅनरवर राजकीय वजन दाखवण्यापेक्षा सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटायला हवा असे मत देखील काही नागरिक व्यक्त करत आहे. 

हल्ली जिल्हा, तालुका , गाव पातळीवर देखील राजकारणाचे स्वरूप बदलले आहे. पक्षनिष्ठा, संयम, शिस्त वगैरे हे सगळे शब्द भाषणापुरते मर्यादित राहिले आहे. आदल्या रात्री एखाद्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता उद्या विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर दिसला तर नवल वाटत नाही. प्रत्येकाला कमी वेळेत साहेबांच्या मर्जीतले होऊन आपले राजकीय स्थान मजबूत करायचे आहे. त्यामुळेच जो तो आपल्या कार्यकर्त्यांची मने जपण्याचा प्रयत्न करत असतो.

याआधीही पुण्यात किंवा पिंपरी चिंचवड परिसरात झालीय भन्नाट बॅनरबाजी.... 

याआधीही पुण्यात किंवा पिंपरी चिंचवड परिसरात भन्नाट बॅनरबाजी झालेली आहे.त्यात बस स्टॉपची चोरी, नगरसेवक गायब, प्रेयसीचे नाव लिहून प्रेमाची कबुली देणारे, वा माफी मागणाऱ्या अशा काही बॅनरचा समावेश आहे. पुणेकरांनी नेहमीच 'हटके' फंडे वापरून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा १२५ फुटी व साडे सहा हजार कार्यकर्त्यांचे फोटो असलेल्या बॅनरची त्यात भर पडली आहे. तसेच या बॅनरवर प्रशासन काही कारवाई करते का दुर्लक्ष करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :Junnarजुन्नरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस