शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कुस्त्यांपूर्वी गावपुढाऱ्यात रंगला आखाडा, जोरदार हाणामारी

By admin | Updated: March 24, 2017 03:50 IST

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावोगावच्या यात्रांमध्ये भरणारा कुस्त्यांचा आखाडा म्हणजे सर्व पै पाहुणे व कुस्ती शौकीनांचा

यवत : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावोगावच्या यात्रांमध्ये भरणारा कुस्त्यांचा आखाडा म्हणजे सर्व पै पाहुणे व कुस्ती शौकीनांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. अधिक बक्षीस मिळणाऱ्या गावात नामवंत पहिलवान मंडळी कुस्त्या खेळण्यासाठी येतात. मात्र सहजपूर (ता. दौंड) येथील यात्रेच्या आखाडया अगोदर गावातील पुढाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. आखाड्यातील पैलवानांच्या कुस्त्या सुरू होण्यापूर्वीच गावपुढाऱ्यांचाच आखाडा ग्रामस्थांना पाहायला मिळाला.सहजपूर येथील यात्रेत पहिल्या दिवशी लोकनाट्य, तमाशा सुरु असताना दोन गटांत भांडणे झाली. त्यामुळे तमाशा अर्धवट बंद करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या आखाड्याच्या अगोदर गावपुढाऱ्यांच्या दोन गटात वर्गणीच्या हिशोबावरून तुंबळ मारामारी झाली. याप्रकरणी यवत पोलिस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.ही घटना काल (दि.२२) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सहजपूर येथील मारुती मंदिरासमोर घडली. दोन्ही गटात झालेल्या मारामारीत लाठ्या, काठीसह लोखंडी गजाने व दगड़ाने मारहाण केल्याचे नमूद आहे. परस्पर विरोधी फिर्यादीत तेजस रमेश म्हेत्रे यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन उपसभापती सुशांत सुनिल दरेकर, भूषण सुनिल दरेकर,संजय शांताराम दरेकर, मंदार संजय दरेकर, मनोज शिलेदार, जयवंत दरेकर, दत्तात्रय थोरात, सुनिल शांताराम दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर भूषण सुनिल दरेकर यांनी दिलेल्या फियार्दी वरुन माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे, मनोज चांगदेव म्हेत्रे, रोहित मोहन म्हेत्रे, राजू पांडुरंग म्हेत्रे , प्रदीप वसंत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)