शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

’आपले सरकार’ पोर्टल ‘आॅफलाईन’; सामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यात अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 17:00 IST

नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सेतू निर्माण करण्यासाठी ‘आपले सरकार’ हा महत्त्वाचा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आला.

ठळक मुद्देनागरिकांना त्यांची तक्रार बसल्याजागी आॅनलाइन पद्धतीने दाखल करता यावी, हा पोर्टलचा उद्देश तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागाबरोबरच राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये सुरू अधिका-यांकडून दिशाभूल केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे

नम्रता फडणीस पुणे : नागरिकांच्या तक्रारी विशिष्ट वेळेत सोडविण्यासाठी  सुरू करण्यात आलेले ‘आपले सरकार’ हे  पोर्टल ‘आॅफलाइन’ झाले आहे. २१ दिवसांच्या आत तक्रारींचे निवारण करणे अपेक्षित असताना अनेक तक्रारी काही महिन्यांपासून तसेच एक वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असल्याने या पोर्टलला ‘आपले सरकार’ म्हणायचे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.       नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सेतू निर्माण करण्यासाठी ‘आपले सरकार’ हा महत्त्वाचा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आला. पोर्टलवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर २१ दिवसांमध्ये (कार्यालयीन दिवसांमध्ये) तक्रारीचे निवारण करणे संबंधित विभागांसाठी बंधनकारक करण्यात आले.  मात्र, या पोर्टलद्वारे २१ दिवसांत तक्रार निवारण करणे तर सोडाच पण  कित्येक महिने व काही तक्रारी या वर्षांहून अधिक काळ प्रलंबित ठेवल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कित्येक नागरिकांना त्यांच्या तक्रारी या ‘प्रलंबित’किंवा ‘प्रक्रिया’ सुरू आहे, या वर्गात दाखविल्या जात असल्याने केवळ गाजावाजा करण्यासाठी हे पोर्टल सुरू झाले का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.नागरिकांना त्यांची तक्रार बसल्याजागी आॅनलाइन पद्धतीने दाखल करता यावी, हा  या पोर्टलचा उद्देश आहे. ‘आपले सरकार’ ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागाबरोबरच राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. तक्रार निवारणाचा कालावधी २१ कार्यालयीन दिवसांचा ठरविण्यात आला आहे. राज्यभरातील कोट्यवधी जनतेची लालफितीच्या कारभारातून सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून  ‘आपले सरकार’ या पोर्टलचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. या पोर्टलचे सामान्य जनतेकडून स्वागत झाले. मात्र हे पोर्टल नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या तक्रारींचे २१ दिवसांत समाधानकारक निवारण न झाल्यास नोडल अधिकारी यांना संपर्क करण्याची अथवा उच्चपदस्थ अधिकारी यांना संपर्क करण्याचीही तरतूद करण्यात आली होती. परंतु अधिका-यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. तर काही वेळा अधिका-यांकडून दिशाभूल केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे..................पोर्टल कसे काम करतेआॅनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तक्रार निवारण प्रणालीच्या मुखपृष्ठावरील ‘नागरिक लॉगिन’ वर क्लिक करायचे आहे. मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी ही माहिती भरून ’तक्रार दाखल करा’ या शीर्षकावर क्लिक करायचे. तक्रारीचे जलद आणि प्रभावीपणे निराकरण होण्यासाठी नागरिकांनी संबंधित प्रशासकीय विभागाची निवड करायची.  ‘मंत्रालय पातळी’ आणि   ’जिल्हा पातळी’ यापैकी पर्याय निवडायचा आणि तक्रार दाखल करायची.........................एका नोकरी लावून देणा-या फर्मने सरकारी मंत्रालयाशी तसेच स्टेट बँक आॅफ इंडियाशी संलग्नता असल्याची कागदपत्रे दाखवून नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे उकळले. त्यांनी अशी खोटी माहिती त्यांच्या वेबसाइटवर टाकली होती. मात्र नंतर ही सर्व माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने मी याबाबत आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार केली. कित्येक दिवस लोटले तरी आजतागायात कोणतीही कारवाई झालेली नाही. नोडल अधिकारी केवळ म्हणणे ऐकून घेतात व आम्ही कळवितो इतकीच माहिती देतात. मुख्यमंत्री कार्यालयाच्या पोर्टलवर असे अनुभव येत असतील तर सामान्यांनी कुठे दाद मागायची?  -वैभव जाधव, अभियांत्रिकीचा विद्यार्थी....................आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलवर एका खाजगी शाळेकडून बेकायदा फीसंदर्भातील तक्रारींसह कित्येक तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र आजतागायत एकाही तक्रारीचे समाधानकारक निवारण झालेले नाही. तक्रार निवारण पोर्टलहून अधिक धक्कादायक अनुभव मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे आला. मी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जवर आजतागायत जन माहिती अधिका-यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. याशिवाय सुनावणी घेण्याचेही कष्ट घेतले नाहीत. याबाबत मी राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे तक्रार केली असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. माझी या क्रमांकाची तक्रार एक वर्षांपासून प्रलंबित आहे.- प्रसाद तुळसकर, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई......................काही प्रशासनातील छोटया समस्या सोडविण्याची  तुरळक उदाहरणे सोडली तर आपले सरकार हे शिक्षण असेल, अन्न भेसळ असेल किंवा पोलीस खात्यातील निष्क्रियता व नागरिकांचे मूलभूत अधिकार हनन होण्याच्या  गंभीर प्रकरणाबाबत मात्र ठोस कारवाई करण्यास पूर्णत: अपयशी ठरले आहे.  हे पोर्टल केवळ नागरिकांच्या तक्रारी संबंधित विभागास पाठविण्याचे काम करणारे पोस्ट आॅफिस किंवा टपालाचे काम करणारे ठरले आहे- अँड. सिद्धांतशंकर शर्मा

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारonlineऑनलाइन