शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आई..आई...अशी हाक ऐकण्यासाठी कधीपासून आसुसलेली पण "कर्तव्य" मह्त्वाचं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 22:00 IST

आई तर दिसते पण ती जवळ का घेत नाही असा प्रश्न तान्हुलीला पडतो. मग तिच्या आर्त हाका सुरू होतात.... 

ठळक मुद्देगेल्या दोन महिन्यापासून कर्तव्यदक्षतेमुळे मुलीपासून दूर

नम्रता फडणीस  पुणे :  कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मुलीच्या दुराव्याने त्या माऊलीचे काळीज गलबलते. असा एकही दिवस जात नाही की तिच्या डोळ्यात चिमुकलीच्या आठवणीने पाणी येत नाही. मुलीला हातात घेण्यासाठी, आई आई अशी हाक ऐकण्यासाठी ती कधीपासून आसुसलेली आहे. पण काय करणार? तिच्या मातृप्रेमाच्या आड कर्तव्य आलं आहे. पुणे शहर तहसील कार्यक्षेत्रातील पर्वती विभागाच्या तलाठी प्रज्ञा बोरगावकर पंडित यांची ही हदय पिळवून टाकणारी कहाणी नि:शब्द करणारी आहे.     माहेरी इचलकरंजीला त्यांची सव्वा वर्षांची चिमुकली संहिता आणि त्या पुण्यात. त्या रोज मुलीला भेटतात, बघतात पण तेही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून.  आई तर दिसते पण आई जवळ का घेत नाही असा प्रश्न तान्हुलीला पडतो. मग तिच्या आर्त हाका सुरू होतात  आई, आई. ती हाक ऐकल्यानंतर त्यांच हदय भरून येतं. त्यामुळे  त्या आता तिच्या समोर जाणचं टाळतात. व्हिडिओ कॉल सुरू झाला की तिला डोळे भरून लांबूनच बघतात आणि मग अश्रूंना पान्हा फुटतो. सध्या आपल्या मुलींची सुंदर चित्र रेखाटूनच त्या मातृत्व अनुभवत आहेत. तिच्या आठवणीने व्याकूळ होताना तिच्याविषयीचे शब्द नकळतपणे कागदावर उमटतात आणि अश्रूंचे मोती निश्चलपणे रेषांवर विसावतात अशी त्यांची अवस्था झाली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून कर्तव्यदक्षतेमुळे मुलीपासून दूर राहावे लागलेल्या या आईला आता तिच्याकडे जाण्याची ओढ लागली आहे. मात्र इच्छा असूनही जाता येत नाही अशी स्थिती आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. दिवसरात्र काम करावे लागत आहे. परंतु  मुलीला भेटण्यासाठी त्यांच्या पतीने संबंधित कार्यालयांशी मेलद्वारे पत्रव्यवहार केला आहे. त्या पत्राच्या उत्तराकडे त्यांचे चातकासारखे डोळे लागले आहेत. आपल्या मुलीबद्दल 'लोकमत'शी साधलेल्या मनमोकळया संवादातून एका आईची ही करूण कहाणी काहीशी अस्वस्थ करून गेली.      त्या म्हणाल्या, मी 8 व 9 मार्चला मुलीला घेऊन इचलकरंजीला माहेरी गेले होते. तेव्हा आम्हाला फोन आला की 9 मार्चला पुण्यात दोन कोरोनाचे रूग्ण सापड्ले आहेत. हा संसर्गजन्य रोग असल्याचे ऐकले होते. म्हणून मग मुलीला तिथेच आठ दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आणि  एकटीच पुण्याला आले. पण नंतर रूग्ण वाढायला लागले आणि 22 मार्चला लॉक डाऊन जाहीर झाला. आमचे काम देखील वाढले. त्यामुळे मुलीला घ्यायला जाताच आले नाही. यापूर्वी देखील जेव्हा25 सप्टेंबर 2019 ला पुण्यात महापूर आला होता. तेव्हा मी नुकतीच जॉईन झाले होते. मुलगी फक्त आठ महिन्यांची होती. माझ्याकडे कामाचा लोड असल्याने तिच्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते.  मात्र तेव्हा किमान ती जवळ होती. आता दोन महिने झाले तिच्यापासून दूर आहे. तिला भेटण्याची ओढ लागली आहे. यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. पण अजून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही.-----------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस